Shubman Gill Century : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शुभमन गिलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडतोय. मुंबईविरोधात क्वालिफायर दोन सामन्यात शुभमन गिल याने शतकी खेळी केली आहे. यंदाच्या हंगामात गिल याचे तिसरे शतक आहे. मोक्याच्या सामन्यात गिल याने शतकाला गवसणी घातली आहे. 49 चेंडूत शुभमन गिल याने शतक झळकावले.  8 षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने गिलने शतक झळकावले. 


प्रथम फलंदाजी करताना गुजरातने दमदार सुरुवात केली. साहा लवकर बाद झाला पण.. गिल याने दुसऱ्या बाजूला आपले काम चोख बजावले. गिल याने आजच्या सामन्यात नववी धाव घेताच मोठा विक्रम नावावर गेला. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा कराणारा फलंदाज ठरलाय. गिल याने आरसीबीच्या फाफचा विक्रम मोडीत काढलाय. गिल याने 15 सामन्यात 722 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात गिल याने शतकी खेळी करत आठशे धावांचा पल्ला पार केला आहे. 


आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


शुभमन गिल (GT) – 822*
फाफ डू प्लेसिस (RCB) – 730
विराट कोहली (RCB) – 639
डेवॉन कॉनवे (CSK) – 625
यशस्वी जयस्वाल (RR) – 625


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात ऑरेंज कॅप शुभमन गिल याच्याकडेच राहणार आता हे जवळपास निश्चित झालेय. आगाडीच्या पाच फलंदाजामध्ये सध्या खेळत असलेल्या संघातील फक्त डेवेन कॉनवे याचाच समावेश आहे. कॉनवेच्या नावावर 625 धावा आहेत. कॉनवेला अजून एक सामना खेळायचा आहे. या एका सामन्यात कॉनवे 150 पेक्षा अधिक धावांचे अंतर भरून काढावे लागेल, हे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे यंदाची ऑरेंज कॅफ शुभमन गिलकडेच राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.


गिल दा मामला....


शुभमन गिल याने पहिल्या चेंडूपासून दमदार फलंदाजी केली. गिल याने आठ षटकार आणि चार  चौकाराच्या मदतीने शतकाला गवसणी घातली. शुभमन गिल याच्या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकाच हंगामात एकापेक्षा जास्त शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिल याची नोंद झाली आहे. याआधी हा विक्रम विराट कोहली आणि जोस बटलर यांच्या नावावर होता. बटलर आणि विराट कोहली यांनी एकाच हंगामात प्रत्येकी चार चार शतके लगावण्याचा विक्रम केलाय. आता या यादीत गिलचा समावेश झालाय.