एक्स्प्लोर

IND vs AUS 4th Test Live Streaming : चौथ्या कसोटीची वेळ बदलली; जाणून घ्या कधी, कुठे अन् किती वाजता पाहू शकता Ind vs Aus कसोटी सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.

India vs Australia 4th Test Live Streaming : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि आता चौथा कसोटी सामना गुरुवार 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून ओळखला जातो.

टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या मालिकेची सुरुवात दणदणीत विजयाने केली होती. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने कांगारूंचा 295 धावांनी पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी 10 गडी राखून जिंकून मालिकेत बरोबरी केली. त्यानंतर तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. आता चौथ्या कसोटीत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना कधी, कोठे होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवार, 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरू होणार आहे. सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार पहाटे 4.40 वाजता होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना कुठे आणि कसा बघता येईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट पाहता येईल. याशिवाय मोबाईलवर सामना पाहणारे दर्शक डिस्ने हॉटस्टार ॲपवर ही कसोटी स्ट्रीम पाहू शकता. तुम्हाला या सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स abplive.com या एबीपी मराठी वेबसाइटवर मिळू शकतील.

मेलबर्न कसोटीत 'या' भारतीय खेळाडूंवर असणार लक्ष 

मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत सर्वांच्या नजरा केएल राहुलवर असतील. बॉक्सिंग डे कसोटीत त्याने दोन शतके झळकावली आहेत. त्याने त्याच्या कसोटी करिअरची सुरूवातही बॉक्सिंग डे कसोटीने केली. याशिवाय विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.

चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.

हे ही वाचा -

Sameer Rizvi Fastest Double Century : 97 चेंडूत 201 धावा, 20 षटकार अन् 13 चौकारांचा पाऊस; धोनीच्या लाडक्या रिझवीचं वेगवान द्विशतक, VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
Maharashtra Cabinet Portfolio : अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
Weather Update: पुण्यासह राज्याच्या 'या' भागात हवापालट, थंडीचा जोर ओसरला, कसं राहणार तापमान, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पुण्यासह राज्याच्या 'या' भागात हवापालट, थंडीचा जोर ओसरला, कसं राहणार तापमान, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Nashik Fog : नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Meet Santosh Deshmukh Family | ओमराजेंनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेटAjit Pawar Angry : खातेवाटपाचा प्रश्न, अजित पवार चिडले! म्हणाले, Pratap Sarnaik : सरनाईकांना नातवामुळे मंत्रिपद मिळालं? स्वतः सांगितला लाल दिव्याचा किस्साTop 80 at 8AM Superfast 22 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
Maharashtra Cabinet Portfolio : अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
Weather Update: पुण्यासह राज्याच्या 'या' भागात हवापालट, थंडीचा जोर ओसरला, कसं राहणार तापमान, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पुण्यासह राज्याच्या 'या' भागात हवापालट, थंडीचा जोर ओसरला, कसं राहणार तापमान, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Nashik Fog : नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Mumbai: उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
Rohit Sharma Injury : मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना गंभीर दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
Horoscope Today 22 December 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget