ENG vs IND: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. विराट कोहलीची बॅट मागील अडीच वर्षापासून शांत आहे. इंग्लंड दौऱ्यात विराट त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा होती. परंतु, इंग्लंडविरुद्धही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीवरून भारतीय संघात दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. एक गट विराटची पाठराखण करतोय. तर, दुसरा गट त्याला संघाबाहेर करण्याची मागणी करतोय. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीनं त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलीय. 


इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीनं आतापर्यंत 11, 20, 1, 11 आणि 16 धावा केल्या आहेत. यामुळं विराट कोहलीला विश्रांती देण्यात यावी किंवा त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला संघात संधी द्यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर विराटनं इंन्स्टावर पोस्ट करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं या पोस्टच्या माध्यमातून सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. 


विराटची इन्स्टाग्राम पोस्ट- 



विराट कोहलीची सकारात्मक पोस्ट
विराट कोहलीनं एका भिंतीजवळ बसून फोटो काढलाय. त्या भिंतीवर "मी पडलो तर काय? ओह, माय डार्लिंग, तू उडालास तर काय?" असा मॅसेज लिहला गेलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये विराटनं दुष्टीकोन असं लिहलंय. त्याच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर विराटनं उपरोधिपणे भाष्य केलं आहे. कोहलीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


मागील अडीच वर्षांपासून विराटची बॅट शांत
विराट कोहलीनं 2022 मध्ये 18 डावांमध्ये 25.50 च्या सरासरीनं 459 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 79 धावा आहे. कोहलीनं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यावरही कोहली धावा काढण्यासाठी झगडत आहे. मागील अडीच वर्षात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकलं नाही. भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यात विराट कोहली कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 


वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेतून विराटला वगळलं
इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना खेळल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत वेस्ट इंडीजशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दरम्यान, टी-20 मालिकेसाठी भारतानं संघ जाहीर केलाय. यामध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, विराट कोहलीला डच्चू देण्यात आला आहे. तसेच वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला संघात स्थान मिळत का? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. 


हे देखील वाचा-