West Indies T20I squad vs India:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकाही खिशात घालेल. पण त्यापूर्वीच वेस्ट इंडिजने टी २० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. वनडे मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाच सामन्याची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी निकोलस पूरन याचं पुनरागमन झालेय. टी२० मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.


भारताविरोधात मायदेशात होणाऱ्या पाच सामन्याच्या टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजने संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व रोवमन पॉवेल (Rovman Powell) याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, जेसन होल्डर, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर आणि उपकर्णधार काईल मेयर्स या संघाचा भाग असतील. वेस्ट इंडिज संघाने 2 दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा संघात संधी दिली आहे.  अनुभवी फलंदाज शाय होप (Shai Hope) आणि वेगवान गोलंदाज ओशेन थॉमस (Oshane Thomas) यांचे पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडिज संघाचा वनडे कर्णधार असलेल्या शाय होप याने अखेरचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना फेब्रुवारी 2022मध्ये खेळला होता. तसेच, थॉमस डिसेंबर 2021नंतर पहिल्यांदा खेळताना दिसेल.


वेस्ट इंडिजचा संघात कोण कोण ?


रोवमन पॉवेल (कर्णधार), काईल मेयर्स (उप कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅक्कॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशेने थॉमस.






टी20साठी भारतीय संघ -


इशान किशन (विकेटकिपर) , शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार


वेळापत्रक - 



टी 20 सामने (संध्याकाळी 8 वाजता)


3 ऑगस्ट 2023 - पहिला टी20 सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद


6 ऑगस्ट 2023 - दुसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना


8 ऑगस्ट 2023 - तिसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना


12 ऑगस्ट 2023 - चौथा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा 


13 ऑगस्ट 2023 - पाचवा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा