SRH VS KKR Live Score IPL 2025 : राजधानीत हेनरिक क्लासेनचे वादळी शतक, हैदराबादने कोलकात्याचा 110 धावांनी केला पराभव

SRH VS KKR Live Updates IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 68 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आज कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. 

Advertisement

किरण महानवर Last Updated: 25 May 2025 11:22 PM

पार्श्वभूमी

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Updates : आयपीएल 2025 च्या 68 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आज कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत....More

हैदराबादने कोलकात्याचा 110 धावांनी केला पराभव

अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा 110 धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने हंगामाचा शेवट केला. रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत तीन गडी गमावून 278 धावा केल्या. आयपीएलमधील हा तिसरा सर्वोच्च स्कोअर आहे. प्रत्युत्तरात, कोलकाता संघ 18.4 षटकांत 168 धावांवर बाद झाला. सनरायझर्सकडून जयदेव उनाडकट, इशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.