CSK vs GT IPL 2025: आज झालेल्या गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यात चेन्नई संघाने गुजरात संघाला सर्व आघाड्यांवर मात दिली...अव्वल संघांचा हा सलग चौथा पराभव आणि गुजरात संघाचा सलग दुसरा..सर्व क्रीडारसिकांच्या मनातील आखाड्यांना छेद देणारा हा पराभव..कालपर्यंत कागदावर सोपी वाटणारी आजची लढत गुजरात संघासाठी कठीण गेली...आणि क्रमांक १ आणि क्रमांक २ च्या शर्यतीत सध्यातरी ते मागे पडले आहेत...बंगळूर आणि पंजाब संघाला फक्त विजय त्यांना आघाडीवर घेऊन जाऊ शकतो...
आज चेन्नई संघाने त्यांच्या या वर्षाच्या प्रवासाचा शेवट गोड केला..पण त्यांनी शेवटच्या काही सामन्यात भविष्यातील मजबूत संघाची बीजे रोवली...आज त्यांच्याकडे आक्रमक आयुष आणि उर्विल आहे...मधल्या फळीत एबीडीचा वारसा सांगणारा ब्रेविस आहे..गोलंदाजीत स्विंग वर नियंत्रण असणारा कंबोज आहे... फिरकीचा जादूगार नूर अहमद आहे आणि सगळ्यात महत्वाचे त्यांच्याकडे ऋतुराज आहे...हा संघ पुढील वर्षी तरुणांचा तडफदार संघ असेल....आणि नव्या दमाने ते पुन्हा एकदा चेन्नई संघाची लेगसी राखून ठेवण्यासाठी उतरतील..
आज पुन्हा एकदा मुंबईकर आयुष का भारतीय संघाचा १९ वर्षाखालील कर्णधार आहे हे दाखवून गेला...तो फक्त रोहित शर्मा याला आदर्श मानत नाही तर त्याच्यासारखा निडर होऊन खेळतो आणि त्याचीच वृत्ती कॅरी करतो..आज सुद्धा त्याने १७ चेंडूत ३४ धावा ठोकून काढताना ३ षटकार मारले..सांघिक ३४ धावा असताना सुद्धा कॉन्वे याने खाते उघडले नव्हते..आयुष बाद झाल्यावर आलेल्या उर्विल याने पुन्हा एकदा छोट्या कॅमिओ ने क्रिकेट रसिकांची मने जिंकली...तो आक्रमक आहेच पण शैलीदार सुद्धा आहे त्याने सुद्धा आयुष प्रमाणेच १९ चेंडूत ३७ धावा करून आज चेन्नई संघ मोठी धावसंख्या उभारेल याचे संकेत दिले...उर्विल आणि आयुष बाद झाल्यावर एका बाजूने कॉन्वे याने नांगर टाकून फलंदाजी केली आणि आपले अर्धशतक धावफलकावर लावले.
आज पुन्हा एकदा बेबी एबीडी त्याच्या टोपण नावाप्रमाणेच खेळला..२३ चेंडूत त्याने ५७ धावा करून संघाला २३० चा पल्ला गाठून दिला..अर्शद याला मारलेला रिव्हर्स स्कूप ..सिराज याला स्वीपर कव्हर वरून मारलेला उंच षटकार.. रशीद खान याला त्याच्या डोक्यावरून मारलेला षटकार खरोखर एबीडीचे आठवण करून देऊन गेले. २३० धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या चेन्नई संघाला सुरवातीपासून धक्के बसत गेले. कम्बोज याच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर भारतीय संघाचा नवोदित कर्णधार बाद झाला...तर मोठा फटका खेळताना बटलर अधिक वेळ न घेता खलीलच्या गोलंदाजीवर बाद झाला....फलंदाजीत चमकणारा आयुष याने एक अप्रतिम झेल घेऊन रुदरफोर्ड याला तंबूत पाठविले...आणि या कोसळण्यातून गुजरात संघ बाहेर येऊ शकला नाही ....जडेजा आणि नूर यांनी आपल्या फिरकीचा फास आवळून चेन्नई संघ लवकर विजयी होईल हे पाहिले...आज गुजरात संघाकडून प्रतिकार केला तो साई सुदर्शन याने....२८ चेंडूत ४१ धावा करताना त्याने पुन्हा एकदा जे ६ चौकार मारले ते फक्त देखणे नव्हते तर तो इंग्लंडमध्ये गोऱ्या लोकांकडून किती टाळ्या मिळवू शकतो याची साक्ष देऊन गेले. आजच्या गुजरात संघाच्या पराभवाने क्रिकेट हा सुंदर अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले... लॉ ऑफ अवरेजेस प्रत्येकाला लागू होते हे सुद्धा सिद्ध झाले. ..आता आजच्या सामन्यात कदचित आपल्याला क्रमांक १ समजू शकतो...जर अय्यर आणि पाँटिंग जोडी त्यांच्या आक्रकतेनुसार खेळली तर...