IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना आज होणार आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. अखेरचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. अखेरचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील, यात शंका नाही. पहिला वनडे सामना भारतीय संघाने जिंकला होता, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत वेस्ट इंडिजने पलटवार केला. आता तिसरा आणि निर्णायक सामना कोण जिंकणार ? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष्य लागलेय. 


अखेरच्या एकदिवसीय सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहली पुनरागमन करतील. दुसऱ्या सामन्यात सिनिअर खेळाडूंना आराम दिला होता. दोन्ही एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. गोलंदाजांनी आले काम चोख बजावले होते. आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ कसा कामगिरी करतो? याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलेय. 


कुठे पाहाणार सामना ?


भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील तिसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. हा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. याव्यतिरिक्त सामना मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर पाहता येऊ शकतो. एबीपी माझाच्या संकेतस्थाळवरही तुम्हाला सर्व माहिती मिळणार आङे.


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील खास आकडेवारी 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडेची सर्वोच्च धावसंख्या भारताची आहे. 2011 मध्ये इंदोर येथे भारताने आठ बाद 418 धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात विरेंद्र सेहवागने 219 धावांची भागिदारी केली होती. 


निचांकी धावसंख्याही भारताच्याच नावावर आहे. 1993 मध्ये भारतीय संघ 100 धावांवर ऑलआऊट झाला होता. 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झालेल्या वनडेमध्ये सर्वोच्च भागिदारी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावावर आहे. दोघांनी 246 धावांची भागिदारी केली आहे. 


विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. विराट कोहलीने 41 डावात 2261 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीने 9 शतके झळकावली आहेत. वेस्ट इंडिजकडून  कर्टनी वॉल्श याने 38 डावात सर्वाधिक 44 विकेट घेतल्या आहेत. 


रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोदं आहे. रोहित शर्माने 35 षटकार ठोकले आहेत. तर विराट कोहलीने 239 चौकार लगावले आहेत. 


माजी कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक 47 फलंदाजांना बाद केलेय, यामध्ये 14 स्टपिंग आणि 33 झेल आहेत. 


भारताने वेस्ट इंडिजविरोधात वेस्ट इंडिजमध्ये 44 वनडे खेळले आहेत. यामध्ये भारताला 20 विजय आणि 21 पराभवाचा सामना करावा लागला, तीन सामन्याचा निकाल लागला नाही. 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये न्यूट्रल ठिकाणी 36 सामने झालेत, त्यामध्ये भारताने 19 विजय आणि 105 पराभव स्विकारलेत 2 सामन्याचा निकाल लागला नाही.