Women's Asia Cup 2022: पुरूष आशिया चषकानंतर आता येत्या 1 ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकालाही सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यासह बहुतेक देशांनी आपपल्या संघाची घोषणा केलीय. ही स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि थायलंड यांच्यात 1 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. तर, 15 ऑक्टोबरला या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. 


महिला आशिया चषकात एकूण सात संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तानसह श्रीलंका आणि मलेशियाच्या देशानं आपपल्या संघाची घोषणा केलीय. तर, थायलंड, यूएई आणि बांग्लादेश त्यांच्या संघाची घोषणा करणार आहे. 


हरमनप्रीत कौरकडं भारतीय संघाचं नेतृत्व
आगामी महिला आशिया चषकात हरमनप्रीत कौर भारतीय संघाची धुरा संभाळणार आहे. तर, स्मृती मानधनाच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी असेल. याशिवाय, रिचा घोषची भारताच्या संघात विकेटकिपर म्हणून निवड करण्यात आलीय. दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा यांच्यासह जेमिमा रोड्रिग्ज आणि सबिनेनी मेघना यांनाही संधी देण्यात आलीय. महत्वाचं म्हणजे, यास्तिका भाटियाला या स्पर्धेत भारतीय संघात जागा मिळाली नाही. 


भारतीय संघ-
हरमनप्रीत (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबिनेनी मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, यादव, के.पी.नवगिरे.
राखीव खेळाडू- तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर


पाकिस्तान संघ- 
बिस्माह मरूफ (कर्णधार), ऐमान अनवर, आलिया रियाज, आयशा नसीम, ​​डायना बेग, फातिमा सना, कायनात इम्तियाज, मुनीबा अली (विकेटकीपर), निदा डार, ओमेमा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिदरा अमीन, सिदरा नवाज (विकेटकीपर), तुबा हसन.
राखीव खेळाडू-नैशरा संधू, नतालिया परवेज, उम्मे हानी, वहीदा अख्तर.


श्रीलंकेचा संघ-
चमारी अथापथु (कर्णधार), हसीनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कवीशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कौशानी नुथ्यंगना, ओशादी रणसिंघे, मालशा शेहानी, मदुशिका मेथथानंद, इनोका रणवीरा, रश्मि सिल्वा, सुगंधिका कुमारी, अचनी कुलाहारिका सेवंडी


मलेशियाचा संघ-
विनिफ्रेड दुरईसिंगम (कर्णधार), मास एलिसा (उप-कर्णधार), साशा आज़मी, ऐसा एलीसा, आइना हमीज़ा हाशिम, एल्सा हंटर, जमहीदया इंतान, माहिरा इज्जती इस्माइल, वान जूलिया (विकेटकीपर), धनुसरी मुहुनन, आइना नजवा (विकेटकीपर), नुरिल्या नतास्या, नूर अरियाना नात्स्या, नूर दनिया स्यूहादा, नूर हयाती जकारिया. 


थायलंडचा संघ: (लवकरच संघ जाहीर होईल.)


यूएईचा संघ: (लवकरच संघ जाहीर होईल.)


बांगलादेशचा संघ: (लवकरच संघ जाहीर होईल.)


हे देखील वाचा-