Shreyas Iyer Fan Video:  वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्याची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी काल भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये दाखल झालाय. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 22 जुलैपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी एका महिलेचा व्हिडिओ सोशल माडियावर व्हायरल होत आहे. ही महिला भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरची चाहती आहे. तिनं पावसाची चिंता न करता श्रेयस अय्यरला भेटण्यासाठी ट्रिनिडॉड एन्ड टोबेगोच्या (Trinidad and Tobago) पोस्ट ऑफ स्पेनच्या (Port Of Spain Airport) विमानतळावर दोन तास त्याची वाट बघितली. त्यानंतर अखेर श्रेयस अय्यर विमानतळावर पोहचताच त्याचा ऑटोग्राफही घेतलाय. 


संबंधित महिलानं सांगितलंय की, ती भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुलची खूप मोठी चाहती आहे. श्रेयस अय्यरनंतर आता ती रोहित शर्मा आणि केएल राहुलचा ऑटोग्राफ घेण्यासाठी ब्रायन लारा स्टेडियम येथेही जाणार आहे. शिजारा नावाची ही महिला भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याला भेटण्यासाठी उस्तुक आहे. तिनं आतापर्यंत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्या व्यतिरिक्त जवळपास सर्वांचीच भेट घेतलीय. 


व्हिडिओ-



 


भारत-वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेला 22 जुलैपासून सुरुवात
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला एकदिवसी सामना 22 जुलै 2022 रोजी खेळला जाणार आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलीय. एकदिवसीय मालिकेत भारताचा सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.  टी-20 मालिकेतील पहिला सामना 29 जुलै रोजी खेळला जाणार आहे. 


भारताचा एकदिवसीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.


भारताचा टी-20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अव्वल खान. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. (केएल राहुल आणि कुलदीप यादव यांची निवड त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.)


हे देखील वाचा-