ISSF World Cup 2022: चांगवॉन (Changwon) नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत (ISSF World Cup 2022) भारतानं 15 पदकं जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावलंय. या स्पर्धेत भारतानं 15 पदकं जिंकली आहेत. ज्यात 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील अखेरच्या दिवशी भारतीय नेमबाज अनीश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि समीरनं रौप्य पदक भारताला पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यास मदत केली. दरम्यान, या स्पर्धेत भारताच्या कोणत्या खेळाडूंना कोणतं पदक मिळालं? यावर एक नजर टाकुयात.


चांगवान नेमबाजी विश्वचषकात पदक जिंकणारे भारतीय खेळाडूंची यादी-


1) अर्जुन बबुता - सुवर्णपदक (पुरुष 10 मीटर एअर रायफल)


2) शाहू तुषार माने/मेहुली घोष- सुवर्णपदक (10 मीटर एअर रायफल मिश्र संघ)


3) पृथ्वीराज तोंडैमन, विवान कपूर आणि भौनीश मेंदीरत्ता - रौप्यपदक (पुरुष ट्रॅप संघ)


4) शिव नरवाल आणि पलक- कांस्यपदक (10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ)


5) अर्जुन बबुता, शाहू तुषार माने आणि पार्थ माखिजा- सुवर्णपदक (पुरुष 10 मीटर एअर रायफल संघ)


6) एवेनिल वालारिवन, रमिता आणि मेहुली घोष- रौप्यपदक (महिला रायफल संघ)


7) शिव नरवाल, नवीन, सागर डांगी - रौप्यपदक (पुरुष पिस्तूल संघ)


8) रिदम सांगवान, युविका तोमर आणि पलक- रौप्यपदक (महिला 10 मीटर एअर पिस्तूल संघ)


9) ऐश्वर्य प्रताप सिंह- सुवर्णपदक (पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पी)


10) अंजुम मौदगील- कांस्यपदक  (महिला 50 मीटर रायफल थ्री पी)


11) चैन सिंग, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, संजीव राजपूत- रौप्यपदक (पुरुष 50 मीटर रायफल थ्री पी संघ)


12) मैराज अहमद खान- सुवर्णपदक (पुरुष स्कीट)


13) अंजुम मौदगील, सिफ्ट कौर समरा आणि आशी चौकसे- कांस्यपदक (महिला 50 मीटर रायफल थ्री पी संघ)


14) अनिश भानवाला, रिदम सांगवान- कांस्यपदक (25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र संघ)


15) अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि समीर- रौप्यपदक (पुरुष 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल संघ)


हे देखील वाचा-


Nikita Kamlakar: आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरची कन्या निकिता कमालकरनं रौप्य पदक पटकावलं!


Taipei Open 2022: पारुपल्ली कश्यपचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, प्रियांशू रजावत आणि मिथुन मंजुनाथचंही दमदार प्रदर्शन


ISSF World Cup 2022: चांगवॉन नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचा दबदबा, सर्वाधिक पदकं जिंकून अव्वल स्थानावर