India Tour of West Indies: इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीवर एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत नमवल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडीज (IND Vs WI) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. येत्या 22 जुलैपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात कोणाचं पारडं जडं राहिलंय? यावर एक नजर टाकुयात. 


एकदिवसीय मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळणार नाहीत. या मालिकेत भारताचा सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करेल. तर, भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाकडं उप कर्णधारपद सोपवण्यात आलंय. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला सामना 22 जुलै, दुसरा सामना 24 जुलै आणि तिसऱ्या आणि अखेरचा सामना 27 जुलैला खेळवला जाणार आहे. हे सर्व सामने पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क येथे खेळले जाणार आहेत.


भारत-वेस्ट इंडीज हेड टू हेड रेकॉर्ड
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीजचा संघ आतापर्यंत 136 वेळा आमने- सामने आले आहेत. यापैकी 67 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, 63 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं बाजी मारलीय. यातील चार सामने रद्द झाले आहेत. महत्वाच म्हणजे, वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या अखेरच्या पाच एकदिवसीय सामने भारतानं जिंकले आहेत.


भारताचा एकदिवसीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.


हे देखील वाचा-