ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) येथे हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यात न्यूझीलंडकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेला हेन्री निकोल्स (Henry Nicholls) ज्या पद्धतीनं आऊट झालाय? हे कदाचित क्रिकेटविश्वात पहिल्यांदाच घडलं असं असेल. हेन्री निकोल्सचा आऊट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंटही करत आहेत. 


हेन्री निकोल्स कसा झाला आऊट?
हेन्री निकोल्स ज्या पद्धतीनं बाद झाला ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. या सामन्यादरम्यान, इंग्लंडच्या जॅक लीचच्या गोलंदाजीवर हेन्री निकोल्सनं समोर शॉट खेळला. परंतु, चेंडू दुसऱ्या टोकावर उभा असलेल्या डॅरिल मिशेलच्या बॅटला लागला आणि मिड- ऑफमध्ये फिल्डिंग करणाऱ्या अॅलेक्स लीसनं झेल घेतला. याचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटनं सोशळ मीडियावर शेअर केलाय. हेन्री निकोल्सनं 99 चेंडूत 19 धावा केल्या. 


व्हिडिओ-






 


कर्णधार केन विल्यमसनची निराशाजनक कामगिरी
हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉम लॅथम एकही धाव न काढता स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर बाद झाला. तर विल यंग 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी कर्णधार केन विल्यमसनही काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यानं 31 धावांवर आपली विकेट्स गमावली. 


हे देखील वाचा-