West Indies vs Australia, 3rd Test : वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासातला आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात संपूर्ण वेस्ट इंडिज संघ फक्त 27 धावांतच गारद झाला आणि त्यांनी टेस्ट क्रिकेटमधील 129 वर्षांपूर्वीचा लाजिरवाणा विक्रम मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेत वेस्ट इंडिजला हादरवून सोडलं. त्याने एकूण 6 विकेट घेतले, आणि 15व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर जेडन सील्सच्या रूपात शेवटचा विकेट मिळवत इतिहास रचला. स्टार्कला या जबरदस्त कामगिरीसाठी सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आलं.

शून्यावर 7 जण तंबूत अन् अवघ्या 27 धावांवर संपूर्ण संघ गारद

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 225 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजचा पहिला डाव 143 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया फक्त 121 धावांवर माघारी परतला. त्यामुळे विजयासाठी 204 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ फक्त 27 धावांत कोसळला. वेस्ट इंडिजचे 7 फलंदाज खाते न उघडताच आऊट झाले, तर टॉप 5 पैकी 4 फलंदाज शून्यावर तंबूत परतले, जॉन कॅम्पबेल, केव्हलन एंडरसन, ब्रँडन किंग आणि रॉस्टन चेस यांचा समावेश होता. स्टार्कसह, स्कॉट बोलंडने केवळ 2 ओव्हर टाकून 3 विकेट घेतले, तर एक बळी जोश हेजलवूडच्या नावावर गेला.

टेस्ट क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्येच्या डावांची यादी :  

26 – न्यूझीलंड vs इंग्लंड (1955)

27 – वेस्ट इंडिज vs ऑस्ट्रेलिया (2025)

30 – दक्षिण आफ्रिका vs इंग्लंड (1896)

30 – दक्षिण आफ्रिका vs इंग्लंड (1924)

35 – दक्षिण आफ्रिका vs इंग्लंड (1899)

ऑस्ट्रेलियाची मालिका विजयात मोहोर

या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 ने खिशात घातली. कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कच्या नेतृत्वाखाली संघाने वर्चस्व गाजवलं.

हे ही वाचा -

Shubhman Gill On Rishabh Pant: ऋषभ पंत चौथा कसोटी सामना खेळणार की नाही?; शुभमन गिल म्हणाला, रिपोर्ट आला, त्यामध्ये...