IND vs LEI 1st Day: इग्लंड विरुद्ध रिशेड्युल कसोटी सामना खेळण्यापूर्वी भारत आणि काऊंटी संघ लिसेस्टरशायर (Leicestershire vs India) यांच्यात सराव सामना खेळला जात आहे. तब्बल तीन महिन्यानंतर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. एका 21 वर्षाच्या काऊंटी क्रिकेट गोलंदाजासमोर भारतीय संघानं लोटांगण घातलं. परंतु, भारताचा युवा फलंदाज केएस भरतच्या (Srikar Bharat) संयमी खेळी भारतीय संघाची लाज वाचवली. या सामन्यातील पहिल्या दिवसाअखेर भारतानं  246 धावांवर 8 विकेट्स गमावले आहेत. भारताकडून केएल भरत आणि मोहम्मद शामी (Mohammed Shami) क्रिजवर उपस्थित आहेत. 


81 धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी परतला
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार रोहित शर्मानं 25 धावा करून बाद झाला. त्यानंतर विकेट्सची रांगच लागली. या सामन्यातही विराट कोहलीला काही खास कामगिरी करता आली नाही. विराट 33 धावा करून माघारी परतला. केएस भरतनं भारतीय संघाची एक बाजू संभाळून ठेवली. परंतु, दुसऱ्या टोकाकडून विकेट्स पडण्याचा क्रम सुरुच होता. भारतीय संघानं केवळ 81 धावांवर पाच विकेट्स गमावले.पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भरत क्रीझवर उभा होता. पहिल्या दिवशी भारतानं आठ विकेट्सच्या मोबदल्यात 246 धावा केल्या. 


भरत ठरला भारतासाठी तारणहार 
भारतीय संघ लिसेस्टरच्या ग्रेस रोड स्टेडियमवर इंग्लिश काऊंटी क्लब लीसेस्टरशायरशी सामना करत आहे. या चार दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघानं अवघ्या 246 धावांत 8 विकेट गमावल्या. संघाला इथपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय एकमेव युवा यष्टीरक्षक केएस भरतला जातंय. 70 धावांची नाबाद खेळी खेळत भरतनं भारतीय संघाची संघाची धावसंख्या 200 पार पोहचवली आहे. 


रोमन वॉकरची चमकदार कामगिरी
लिसेस्टरशायरचा युवा वेगवान गोलंदाज रोमन वॉकरनं या सामन्यात वर्चस्व गाजवले. त्यानं रोहित, विराटसह भारताच्या एकूण पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वॉकरनं 11 षटकांत 24 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. विल डेव्हिसला दोन आणि प्रसिद्ध कृष्णाला एक विकेट मिळाली. भारतीय संघाचे चार खेळाडू लिसेस्टरशायरकडून खेळत आहेत.


हे देखील वाचा-