Los Angeles Olympics 2028 Cricket Schedule : क्रिकेट प्रेमींसाठी मोठी बातमीसमोर येत आहे. 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेट पुन्हा एकदा दिसणार आहे. आयोजकांनी अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं असून, यामध्ये पुरुष व महिला दोन्ही गटांचा समावेश आहे.

ऑलिम्पिकमध्ये कधी सुरू होईल क्रिकेट स्पर्धा?

क्रिकेट स्पर्धेची सुरुवात 12 जुलै 2028 रोजी होणार आहे. पुरुषांचा सुवर्णपदक सामना 29 जुलैला, तर महिलांचा अंतिम सामना 20 जुलैला खेळवला जाईल. ही स्पर्धा लॉस एंजेलिसपासून 50 किमी अंतरावर असलेल्या पॉमेना शहरातील फेअरग्राउंड्स स्टेडियम येथे पार पडणार आहे.

दररोज दोन सामने; 6 पुरुष आणि 6 महिला संघ 

या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी 6 संघ भाग घेणार आहेत. एकूण 180 क्रिकेटपटू मैदानावर खेळतील. आयोजकांच्या माहितीनुसार दररोज 2 सामने खेळवले जातील. अमेरिका, वेस्ट इंडीजसह क्रिकेटला नवा मंच मिळत असल्याने क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आले आहे.

भारताचा सहभाग निश्चित?

भारतीय संघाचा सहभाग निश्चित होण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. आता सर्वांचं लक्ष भारताच्या ऑलिम्पिकमधील यशाकडे लागलं आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारखे पारंपरिक क्रिकेट राष्ट्रदेखील स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

1900 साली शेवटचं ऑलिंपिक क्रिकेट, ब्रिटन एकमेव सुवर्णविजेता

तुम्हाला माहिती आहे का? ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत फक्त एकदाच क्रिकेटचा समावेश झाला होता, 1900 पॅरिस ऑलिंपिकमध्ये. त्यावेळी फक्त दोन संघ फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन सहभागी झाले होते. ब्रिटनने तो सामना 158 धावांनी जिंकून सुवर्ण पदक पटकावलं होतं. 

हे ही वाचा -

WI vs AUS 3rd Test : वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासातला काळा दिवस! शून्यावर 7 जण तंबूत अन् अवघ्या 27 धावांवर संपूर्ण संघ गारद, 129 वर्षांचा लाजिरवाणा विक्रम मोडला

Eng vs Ind Test News : टीम इंडियाला ज्याने रडवलं, तो मालिकेतून थेट बाहेर, लॉर्ड्स कसोटी जिंकल्यानंतर बेन स्टोक्सच्या इंग्लंडला मोठा धक्का, नेमकं काय घडलं?