Asia Cup : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. पण या भव्य स्पर्धेपूर्वी विविध संघामध्ये खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र सुरु झाले आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार बांग्लादेश संघातील (Team Bangladesh) दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे दोघेही आशिया कप स्पर्धेला मुकणार आहेत. हे खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज हसन महमूद (Hasan Mahmud) आणि यष्टीरक्षक नुरुल हसन सोहन (Nurul Hasan Sohan) अशी आहेत. आयसीसीनं याबद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे.
हसन याला गेल्या आठवड्यात प्रशिक्षणादरम्यान घोट्याला दुखापत झाल्यामुळे तो पुढील महिनाभर अनुपलब्ध राहणार आहे. तर नुरुलला नुकतीच दुखापत झालेल्या बोटावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला देखील विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आल्याने तो देखील आशिया चषक स्पर्धा 2022 मध्ये खेळणार नाही.
शाकिब अल् हसनच्या नेतृत्त्वाखाली बांग्लादेश मैदानात उतरणार आहे. दरम्यान शाकिबला या स्पर्धेतील ध्येयाबाबत विचारलं असता तो म्हणाला, ''माझं या स्पर्धेसाठी कोणतही ध्येय नसून आम्हाला टी20 स्पर्धेतील सामन्यांत चांगली कामगिरी करायची आहे. ही आमच्यासाठी आगामी टी20 विश्वचषकाची (T20 World Cup) तयारी आहे.''
कसं आहे वेळापत्रक?
यंदा भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...
सामना | दिवस | दिनांक | संघ | ग्रुप | ठिकाण |
1 | शनिवार | 27 ऑगस्ट | अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका | बी | दुबई |
2 | रविवार | 28 ऑगस्ट | भारत विरुद्ध पाकिस्तान | ए | दुबई |
3 | मंगळवार | 30 ऑगस्ट | बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान | बी | शारजाह |
4 | बुधवार | 31 ऑगस्ट | भारत विरुद्ध पात्र संघ | ए | दुबई |
5 | गुरुवार | 1 सप्टेंबर | श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश | बी | दुबई |
6 | शुक्रवार | 2 सप्टेंबर | पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ | ए | शारजाह |
7 | शनिवार | 3 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | शारजाह |
8 | रविवार | 4 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
9 | मंगळवार | 6 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 | सुपर 4 | दुबई |
10 | बुधवार | 7 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
11 | गुरुवार | 8 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
12 | शुक्रवार | 9 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
13 | रविवार | 11 सप्टेंबर | सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
हे देखील वाचा-