मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दिवाळीच्या निमित्ताने शेअर केलेल्या एका व्हिडीओ मेसेजमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे विराट कोहलीने लोकांना फटाके न फोडण्याचं आवाहन केलं आहे. परंतु, कोहलीने केलेलं हे आवाहन चाहत्यांना फारसं आवडलेलं नाही. त्यांनी विराट कोहलीवरच प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. तसेच विराट कोहलीच्या समर्थनासाठीही काही चाहते समोर आले आहेत.

Continues below advertisement


विराट कोहलीने ट्विटरवर एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कोहली म्हणाला आहे की, 'माझ्याकडून तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. या निमित्ताने तुम्हाला आनंद आणि शांती मिळो. आपल्याला दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडणं टाळलं पाहिजे आणि पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. तुम्ही सर्व तुमची काळजी घ्या.'





विराट कोहलीने फटाके न फोडण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर अनेक लोक विराटवर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. तसं पाहायला गेलं तर दिवाळीच्या निमित्ताने दिल्ली, हरियाणासह इतर अनेक राज्यांनी फटाक्यांन बंदी घातली आहे. परंतु, काही राज्यांमध्ये फटाके फोडण्यासाठी परवानगीही देण्यात आली आहे.


विराट कोहलीवर निशाणा साधत लोकांनी काही दिवसांपूर्वी विराटने साजरा केलेल्या त्याच्या वाढदिवसाची आठवण करून दिली. दुबईत वाढदिवस साजरा करताना फटाके फोडण्यात आले होते. लोकांनी विराटला यासंदर्भातच प्रश्न विचारला की, तेव्हा तुम्हाला पर्यावरणाची आठवण आली नव्हती का?





आणखी एका यूजरने दिवाळीच्या निमित्ताने विराट कोहलीचा सल्ला पटला नाही. एका युजरने विराटवर निशाणा साधत प्रश्न विचारला की, आम्हाला आमच्या सणांच्या दिवशी कोणताच सल्ला देऊ नये.





एवढंच नाहीतर युजर्सनी विराटच्या लाईफस्टाइलवरही प्रश्न उपस्थित केले. विराट कोहलीला ट्रोल करत त्यांनी त्याच्या कलेक्शनमध्ये असणाऱ्या गाड्यांचाही उल्लेख केला.





दरम्यान, काही चाहत्यांनी यावेळी विराट कोहलीचं समर्थनही केलं. ते म्हणाले की, विराट कोहलीने काहीच चुकीचं म्हटलेलं नाही. एका चाहत्याचं म्हणणं आहे की, दिवाळी दिव्यांचा सण आहे आणि विराट काहीच चुकीचं म्हणालेला नाही.'





आणखी एका युजरने विराटचं समर्थन करत विराट कोहली निडर असल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, अशी हिम्मत प्रत्येकजण करू शकत नाही.


महत्त्वाच्या बातम्या :