सिडनी : भारतीय क्रिकेट टीम सिडनीतील ज्या ऑलिम्पिक पार्क हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. त्या हॉटेलपासून सुमारे 30 कि.मी. अंतरावर असलेल्या क्रॉमर पार्क येथील मैदानावर विमान अपघात झाला आहे. या अपघातातून स्थानिक क्रिकेट खेळाडू आणि फुटबॉलपटू थोडक्यात वाचले आहेत. कोसळणारे विमान पाहून मैदानावरील खेळाडूंना आपला जीव वाचवण्यासाठी दूर पळावे लागले.
जेव्हा विमान क्रॅश होऊन मैदानाजवळ कोसळत होते, तेव्हा क्रिकेट आणि फुटबॉलचे सामने मैदानावर खेळले जात होते. विमान त्यांच्या दिशेने खाली येताना पाहून खेळाडू घाबरुन पळू लागले. क्रॉमर क्रिकेट क्लबचे वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रेग रोलिन्स म्हणाले, की शे़ड मधील खेळाडूंना मी ओरडून सांगतिलं की पळा. त्यानंतर खेळाडू आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावले.
INDvsAUS: सपोर्ट स्टाफसह सर्व भारतीय खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह; खेळाडूंचा सराव सुरु
स्कॉट मेननिंगचे वडील आणि मैत्रीण शेडमध्ये होते. त्यांनी नाईन नेटवर्कला सांगितले, 'मी ओरडत पळत सुटलो आणि तो (पायलट) कसा तरी शेडवर आला. याने 12 लोकांना बाहेर काढले. विमान फ्लाइंग स्कूलचे होते, इंजिनमधील बिघाडामुळे विमान क्रॅश झाले. या अपघातात दोन लोकं जखमी झाली आहेत.
IPL 2020: अजित आगरकरने निवडली त्यांची 'बेस्ट प्लेईंग 11'; विराट, रोहित, राहुलला स्थान नाही
कोरोना विषाणूच्या तपासणीत भारतीय संघ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी खेळाडूंनी शनिवारी सराव सुरू केला. हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ आणि मोहम्मद सिराज यांच्यासह अनेक क्रिकेटपटू नुकत्याच युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले आहेत. सराव सत्रात ते उपस्थित होते.