IND vs SL, 3rd ODI : तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरु भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने चौकार षटकारांचा पाऊस पाडत 390 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. खासकरुन विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांनी शतकं झळकावत भारताला हा धावांचा डोंगर उभा करुन दिला आहे. कोहलीने यावेळी नाबाद 166 तर शुभमनने 116 धावा केल्या आहेत. आता 391 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरत आहे.






सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे एक मोठी धावसंख्या करुन श्रीलंकेवर प्रेशर आणण्याचा भारताचा डाव होता. जो सत्यात आणण्यातही भारताला यश आलं. कर्णधार रोहित आणि शुभमन यांनी आधी उत्तम सुरुवात करुन दिली. पण रोहित 46 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर कोहलीने गिलसोबत डाव सावरला. इकडे गिलने शतक तर कोहलीनं अर्धशतक पूर्ण केलं ज्यानंतर काही वेळात 116 धावांवर गिल तंबूत परतला. त्याने 97 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकार ठोकत 116 धावा केल्या. त्यानंतर श्रेयसने कोहलीची साथ दिली. कोहलीही तुफान फटकेबाजी करु लागला आणि 85 चेंडूत त्याने शतक पूर्ण करत  74 वं आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. ज्यानंतरही त्यानं थांबायचं नाव घेतलं नाही अखेरच्या बॉलपर्यंत कोहली धावा ठोकत होता. त्याने 110 चेंडूत 13 चौकार आणि 8 षटकार ठोकत नाबाद 166 धावा केल्या. कोहली आणि गिलशिवाय इतर फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. अय्यरने 38 धावांचं योगदान दिलं.


कोहली सचिनच्या रेकॉर्डच्या आणखी जवळ


कोहलीनं आज केलंल त्याचं हे 46 वं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक आहे. सचिनने 49 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकं ठोकल्यामुळे कोहली आता सचिनच्या वन-डे शतकांच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. कोहलीने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटर रिकी पॉंटिंग याला मागे टाकलं होतं. रिकीने 71 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली असून कोहलीच्या नावावर आता 74 शतकं झाली आहेत. त्याच्यापुढे केवळ सचिन तेंडुलकर (100 शतकं) आहे. याशिवाय सध्या खेळणाऱ्यांमध्ये कोणता खेळाडू कोहलीच्या आसपासही नाही. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 45 शतकांवर असून कोहलीच्या फक्त एकदिवसीय शतकांचा विचार केला तरी तो वॉर्नरच्या पुढे आहे.


हे देखील वाचा-