IND vs SL, 3rd ODI : एमएस धोनी (MS Dhoni) निवृत्त होऊन आता जवळपास 3 वर्षे होत आली असली तरी आजही त्याची फॅन फॉलोविंग तितकीच आहे. किंबहुना वाढताना दिसत आहे. त्यामुळेच भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना होणाऱ्या तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमबाहेर (greenfield International staidum) धोनीचा तब्बल 50 फुट मोठा कटआऊट लावण्यात आला आहे. धोनीच्या केरळमधील चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या स्टारसाठी ग्रीनफिल्ड स्टेडियमच्या बाहेर 50 फूट मोठा कटआउट लावला आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांनी तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर त्याचा 50 फूट मोठा कटआउट लावला आहे. धोनीच्या या कटआउटचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धोनीच्या या विशाल कटआउटमध्ये तो बॅट घेऊन उभा दिसत आहे. भारतातील धोनीचा हा सर्वात मोठा कटआउट असल्याचे म्हटले जात आहे.
धोनीशिवाय विराट, रोहित आणि संजूचे कटआउट्सही लावण्यात आले होते. महेंद्रसिंग धोनी व्यतिरिक्त भारताचा महान फलंदाज विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज संजू सॅमसन यांचेही कटआउट ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर लावण्यात आले आहेत. भारतीय संघातील या स्टार खेळाडूंचे मोठे कटआउट्स चाहत्यांना खूप आवडत असून आजच्या सामन्यावेळी हे स्टेडियमजवळील आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे.
पाहा फोटो-
भारत आणि श्रीलंका तिसऱ्या वन-डेमध्ये तीन बदलांसह भारत मैदानात
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने यापूर्वीच श्रीलंकेवर 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला हा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश द्यायचा आहे. या सामन्यात दोन्ही संघानी प्रत्येकी दोन बदल करत संघ मैदानात उतरवला आहे. भारताने हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक यांना विश्रांती देत सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली आहे. तर श्रीलंका संघाने अशेन बंडारा आणि जेफ्री वांडर्से या दोघा युवा खेळाडूंना संधी दिली आहे. धनंजया डिसिल्वा आणि Dunith Wellalage या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे.
हे देखील वाचा-