IND vs SL 3rd ODI, Playin 11 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरु होत आहे. नुकतीच नाणेफेक पार पडली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हा तिसरा एकदिवसीय सामना मालिकेच्या निकालावर कोणताही परिणाम करणार नसला तरी भारताला आजचा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. तर श्रीलंका आपल्या दौऱ्यातील आणि या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात आहे.


तर अशा या सामन्यात दोन्ही संघानी प्रत्येकी दोन बदल करत संघ मैदानात उतरवला आहे. भारताने हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक यांना विश्रांती देत सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली आहे. तर श्रीलंका संघाने अशेन बंडारा आणि जेफ्री वांडर्से या दोघा युवा खेळाडूंना संधी दिली आहे. धनंजया डिसिल्वा आणि Dunith Wellalage या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. तर नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे पाहूया...


कसे आहेत दोन्ही संघ?


भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी


श्रीलंका संघ -


अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), अशेन बंडारा, चारिथ असालंका, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, जेफ्री वांडर्से, चमिका करुणारत्ने, कसून रजिथा, लाहिरू कुमारा






 हे देखील वाचा-