नवी दिल्ली : पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या मालिकेत खेळण्यास मी तयार आहे. विश्रांतीसाठी मी बीसीसीआयकडे (BCCI)  वेळ मागितला नाही. माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत, असे मत विराट कोहली (Virat Kohli) याने व्यक्त केले आहे. 


दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून विराट कोहलीने माघार घेतली आहे. जानेवारीत विश्रांती मिळावी अशी विनंती विराटनं बीसीसीआयला केली आहे. 9 जानेवारीला विराटची लेक वामिका हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ब्रेक द्यावा असं विराटनं बीसीसीआयला कळवल्याच्या बातम्या माध्यमांतून आल्या होत्या. परंतु, विराटने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


सौरव गांगुलीच्या दाव्यावरही मांडली बाजू
विराट कोहलीने यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेल्या दाव्यावरही आपली बाजू मांडली. रोहित शर्माला एकदिसीय संघाचा कर्णधार बनविण्याच्या बाबत मी विराट कोहलीला सांगितलं होतं. असं सौरव गांगुली यांनी म्हटले होते. परंतु, यावर विराटने सांगितले आहे की, बीसीसीआयकडून मला कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नाही.
 
बीसीसीआयने नुकतेच काही दिसांपूर्वी विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवत सलामीवीर रोहित शर्माला कर्णधार पदाची जाबाबदारी दिली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्वत: येऊन सांगितले होते की, हा निर्णय बोर्ड आणि निवड समितीने घेतला आहे. त्याशिवाय त्यांनी हा पण खुलासा केला होता की, विराट कोहलीला बोर्डाने टी-20 चे कर्णधारपद सोडण्याची विनंती केली होती. त्यावेळी कोहलीने त्याला नकार दिला होता. त्यामुळे एकदिवसीय संघाचीही जबाबदारी रोहितकडेच दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला.   


महत्वाच्या बातम्या