Ashes Series Update : अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडवर (England) उत्कृष्ट असा 9 विकेट्सनी विजय मिळवला आहे. त्यानंतर आता दुसरा सामना 16 डिसेंबरला खेळवला जाणार असून यामध्ये विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडचा संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान या सरावादरम्यान इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स याचा चेंडू कर्णधार जो रुटच्या हॅल्मेटवर आदळल्याची घटना समोर आली आहे. 

  


सुदैवाने यामध्ये रुटला जास्त दुखापत झालली नाही. मात्र हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला बरेच व्ह्यूज मिळत असून अनेक कमेंट्सही पडत आहेत. दरम्यान बेन स्टोक्स हा मागील काही काळ विश्रांतीवर असल्याने अॅशेसमध्ये तो दमदार कामगिरी करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्याचा हा बाऊन्सर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची झोप नक्कीच उडवले!



असा मिळवला पहिल्या सामन्यात विजय


पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का बसला होता. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 147 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने पाच बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिला डावात धावांचा डोंगर उभारला. ट्रेव्हिस हेडने 152 धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 425 धावा उभारत 278 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव ऑस्ट्रेलियाने 297 धावांवर गुंडाळला. ज्यामुळे विजयासाठी आवश्यक केवळ 20 धावा इंग्लंडने एक विकेट गमावत पूर्ण केल्या आणि सामना 9 विकेट्सनी जिंकला. 


अॅशेस मालिकेतील उर्वरीत सामने


अॅशेस मालिकेतील दुसरा सामना 16-20 डिसेंबर दरम्यान अॅडलेड येथे होणार आहे. तिसरा सामना 26-30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न आणि चौथा कसोटी सामना 5-9 जानेवारी दरम्यान सिडनी येथे पार पडणार आहे. तर, पाचवा कसोटी सामना 14-18 जानेवारी दरम्यान होबार्ट येथे खेळवला जाणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha