SA Vs IND: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची आहे. दक्षिण आफ्रिकाच्या (IND vs SA) च्या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी संघाचा आघाडीचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) दुखापतीतून सावरला असून त्यानं नेटमध्ये फलंदाजीही सुरू केलीय. इंग्लंड दौऱ्यावर केएल राहुल चांगली कामगिरी केली होती. दरम्यान, डाव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यानं केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाहेर पडला होता. मात्र, आता तो बरा झाला असून नेटमध्ये सराव करताना दिसत आहे.
राहुलने मुंबईत भारतीय संघासोबतच्या पहिल्या नेट सत्रात भाग घेतला. राहुलनं कूवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये राहुल नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे.
व्हिडिओ-
केएल राहुलला एकदिवसीय संघाचं उपकर्णधारपद मिळण्याची शक्यता
भारताचा सलामीवीर रोहित शर्माला एकदिवसीय कर्णधार बनवल्यानंतर उपकर्णधारपदाचं पद रिक्त झालंय. दरम्यान, एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. केएल राहुलसह ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरकडं भारतीय एकदिवसीय संघाचं कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. परंतु, उपकर्णधारपदाच्या शर्यतीत केएल राहुलचं पारडं जड दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत केएल राहुलला उपकर्णधारपदाची जबाबादारी दिली जाऊ शकते, अशी माहिती इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तात काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल
भारतीय संघातील बहुतेक खेळाडू मुंबईतील एका हॉटेलमध्ये बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, दुखापतीमुळं रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. या दौऱ्याला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 16 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वैळापत्रकात बदल करण्यात आले. या दौऱ्यात संघाला तीन कसोटी आणि फक्त तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. टी-20 मालिकेबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय जाहीर करणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- India Tour of South Africa 2021: कर्णधारपदावरून टीम इंडियात वाद? कसोटी मालिकेतून रोहित बाहेर, एकदिवसीय मालिकेबाबत विराटचा मोठा निर्णय
- Happy Birthday Kuldeep Yadav: अपयशानं खचला, तेव्हा थेट आत्महत्येचा निर्णय घेतला; कुलदीप यादवच्या आयुष्यातील थरार
- Mohammad Rizwan : पाकिस्तानचा सलामीवीर रिजवानची अफलातून खेळी, टी20 क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्सचा पाऊस