Team India Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli)च्या मालकीच्या बंगळुरुमधील One8 Commune रेस्टॉरंट आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे. बंद करण्याच्या वेळेचा नियम न पाळल्याबद्दल, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. 


बंगळुरुमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत उशिरा पब चालू ठेवल्याच्या कारणावरून 3-4 पबवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विराट कोहलीच्या One8 Commune रेस्टॉरंट आणि पबचा देखील समावेश आहे. मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बंगळुरुमध्ये पब रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असताना ती वेळ उलटून गेल्यानंतरही पब सुरू ठेवल्याने ही कारवाई झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.






नेमकं प्रकरण काय?


बंगळुरूमधील कब्बन पार्क पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कस्तुरबा रोडवर स्थित One8 Commune 6 जुलै रोजी रात्री 1.20 वाजता सुरु होता. यावेळी ग्रहाक देखील होते. रात्री गस्त घालत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला One8 Commune रात्री उशिरापर्यंत उघडा असल्याचा फोन आला, उपनिरीक्षक पहाटे 1:20 वाजता पबमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना आढळले की पब अजूनही ग्राहकांना सेवा देत आहे. त्यानंतर या पबवर कारवाई करण्यात आली.


विराट कोहलीची संपत्ती किती?


विराट कोहलीची मीडिया रिपोर्ट्सनुसार एकूण संपत्ती 1 हजार 50 कोटी इतकी आहे. विराटलाही बीसीसीआयकडून A+ वार्षिक करारानुसार वेतन मिळतं. तसेच विराटला आयपीएलमधून 16 कोटींची कमाई होते. विराट जाहिरातीतूनही कमावतो. विराट मुंबई त्याची पत्नी अनुष्का शर्मा हीच्यासह बंगल्यात राहतो. त्या बंगल्याची किंमत 34 कोटी इतकी आहे. विराटची गुरुग्राम येथे संपत्ती आहे, त्याची किंमत जवळपास 100 कोटी इतकी आहे.


विराट-अनुष्काने लंडनमध्ये घर घेतले?


विराट कोहलीची खूप संपत्ती आहे. त्यांची दिल्ली आणि मुंबईत घरे आहेत. रिपोर्ट्सनुसार, कोहलीने अलीबागमध्ये नुकताच 10 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. आता तो लंडनमध्ये असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. अनुष्का बऱ्याच दिवसांपासून लंडनमध्ये आहे. अकायच्या जन्माआधीच ती लंडनमध्ये गेली होती. अकायचा जन्म लंडनमध्येच झाल्याचा दावा केला जात आहे. अकायच्या जन्मामुळे टीम इंडियातून ब्रेक घेऊन कोहली लंडनला गेला होता. महत्त्वाची बाब म्हणजे अनुष्का गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनमध्ये राहत आहे. 


संबंधित बातम्या:


Kuldeep Yadav: कुलदीप यादवने दिली गुड न्यूज, लवकरच लग्नबंधनात अडकणार, म्हणाला, बॉलिवूड अभिनेत्रीसोबत...


'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान


Ind vs Zim T20: 'अहंकाराला पायबंद बसला...'; टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शशी थरुर यांचं ट्विट