Kuldeep Yadav: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. सांघिक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने अपराजित राहून जग जिंकले. अशातच आता भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने मोठे विधान केले आहे. आपण लवकरच लग्न करणार असल्याचे कुलदीपने सांगितले. 


मी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कोण्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत नाही; पण लवकरच लग्नाची चांगली बातमी मिळेल. मी आज जिथे आहे, यामध्ये माझे प्रशिक्षक, मित्र आणि संघाचा मोठा हात आहे, असेही कुलदीप यादवने सांगितले. कुलदीप एका वृत्तवाहिनीशी बोलत होता. नुकत्याच संपलेल्या टी-20 विश्वचषकात कुलदीप यादवने 10 बळी घेतले होते.


नरेंद्र मोदींना भेटून आनंद- कुलदीप यादव


टी-20 विश्वचषक विजयाबद्दल कुलदीप यादव म्हणाला, ‘आम्ही खूप आनंदी आहोत. याची आम्ही बराच वेळ वाट पाहत होतो. आपल्या लोकांना इथे पाहून खूप छान वाटतं. विश्वचषक आणताना खूप आनंद होत आहे. हे आपल्यापेक्षा आपल्या भारतासाठी अधिक आहे…ते छान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आनंद झाला.






विश्वचषकात कुलदीपची चांगली कामगिरी-


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 विश्वचषक संघात तसा फारसा काही बदल केला नाही. फक्त मोहम्मद सिराज ऐवजी संघात कुलदीप यादवला स्थान दिलं. कुलदीप यादवनेही या बदलला अनुरूप कामगिरी केली आणि विजयात मोलाचा वाटा उचलला. कुलदीप यादव सुरुवातीच्या तीन सामन्यात खेळला नाही. मात्र उर्वरित पाच सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने 10 विकेट्स काढल्या. 


मुंबई विजयी परेड-


दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर खेळाडू मुंबईला रवाना झाले. मुंबईतील मेन इन ब्लूने मरीन ड्राईव्ह ते आयकॉनिक वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन बस विजय परेड काढली. उत्साही चाहत्यांच्या जयजयकार, जल्लोष आणि टाळ्यांच्या गजरात, संघ वानखेडे स्टेडियमवर गेला, जिथे त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली. 


संबंधित बातम्या:


'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान


Ind vs Zim T20: 'अहंकाराला पायबंद बसला...'; टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शशी थरुर यांचं ट्विट


अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला