Virat Kohli on Bengaluru Stampede : आनंदाचा क्षण शोकांतिकेत बदलला, माझ्या डोक्यात सतत तेच...; बंगळुरुमधील चेंगराचेंगरीवर कोहलीचं भाष्य, काय म्हणाला?
इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा पराभव करून तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच विजेतेपदावर आपले नाव कोरले.

Virat Kohli on Bengaluru Stampede : इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा पराभव करून तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच विजेतेपदावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाने खेळाडूंसह बंगळुरूमधील चाहत्यांचाही आनंद गगनाला भिडला होता. चाहत्यांना खास भेट देण्यासाठी आरसीबी फ्रँचायझीने 4 जून रोजी बंगळुरूमध्ये विजय मिरवणुकीचे आयोजन केले. मात्र, हा निर्णयच त्यांची सर्वात मोठी चूक ठरला. अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त संख्येने चाहते जमल्याने प्रचंड गोंधळ झाला आणि त्यातून झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आता आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली याचेही विधान समोर आले आहे.
आनंदाचा क्षण शोकांतिकेत बदलला, माझ्या डोक्यात सतत तेच...
बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या घटनेला जवळपास तीन महिने उलटल्यानंतर विराट कोहलीने आपली भावना व्यक्त केली असून, आरसीबी फ्रँचायझीनं त्याचा हा मेसेज आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.
कोहली म्हणाला की, "जीवनात कितीही अनुभव आले तरी 4 जूनसारख्या दुःखद धक्क्यासाठी काहीच तयार करत नाही. आपल्या फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा क्षण ठरला असता तो… दुर्दैवाने एका शोकांतिकेत बदलला. या घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्यासाठी मी सतत विचार करतोय, प्रार्थना करतोय. तसेच जखमी झालेल्या आपल्या चाहत्यांसाठीही. तुमचं हे दुःख आता आपल्या कहाणीचा एक भाग आहे. आपण सारे मिळून संवेदनशीलतेने, आदराने आणि जबाबदारीने पुढे जाऊ....
“Nothing in life really prepares you for a heartbreak like June 4th. What should’ve been the happiest moment in our franchise’s history… turned into something tragic. I’ve been thinking of and praying for the families of those we lost… and for our fans who were injured. Your… pic.twitter.com/nsJrKDdKWB
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 3, 2025
आरसीबी फ्रँचायझीकडून 25 लाख रुपयांची मदत जाहीर
बंगळुरूमधील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझीनं ‘आरसीबी केअर्स’ या माध्यमातून प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. या दुर्घटनेत सुमारे 33 जण जखमी झाले होते.
या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली असून, त्यानंतरपासून बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. दरम्यान, महिला वनडे वर्ल्ड कप 2025मधील येथे होणारे सामने नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा -





















