Virat Kohli in IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारत 31 धावांनी पराभूत झाला. आफ्रिकेच्या 297 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज हवी तशी कामगिरी करु शकले नाहीत. पण या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) मात्र अर्धशतक झळकावत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने सचिनचा (Sachin tendulkar) परदेशी भूमीवर एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे.


सामन्यात भारताकडून शिखर (79) आणि विराटने (51) केवळ अर्धशतंक झळकावली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर इतर फलंदाज पटापट बाद झाल्याने भारताने सामना गमावला. दरम्यान सामन्यात विराट फलंदाजीला आला आणि काही धावा करताच त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा परदेशी भूमीत वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला. विराटने 51 धावा करत सचिनच्या परदेशातील 5 हजार 65 धावांना मागे टाकत 5 हजार 80 धावांपर्यंत मजल मारली आहे. 


परदेशी भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 भारतीय 



  1. विराट कोहली* - 5 हजार 80 धावा

  2. सचिन तेंडुलकर - 5 हजार 65 धावा

  3. एमएस धोनी - 4 हजार 520 धावा

  4. राहुल द्रविड - 3 हजार 998

  5. सौरव गांगुली - 3 हजार 468 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha