Playing 11 of Team India: भारत आणि दक्षिण अफ्रीका (Ind vs SA) यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला (ODI Series) सुरुवात झाली आहे. आज पहिला सामना पार्ल (Parl) च्या मैदानात खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रीका (South Africa) संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने सध्या भारत गोलंदाजी करत आहे. दरम्यान भारताने (Team India) या सामन्यात तीन वेगवान गोलंदाजासह आणि दोन स्पिनर खेळवले आहेत. पण सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या स्टार फलंदाजांना मात्र संधी मिळालेली नाही. संघात पाच गोलंदाज, एक ऑलराउंडर आणि चार फलंदाजांसह एक विकेटकीपर खेळत आहे.


दोन्ही संघाचे अंतिम 11


भारत : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, आर. आश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.


दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, जानमन मलान, एडेन मार्करम, वॅन डर डस्सेन, बावुमा (कर्णधार), डेविड मिलर, एडिले फेहलुकवायो, मार्को जेनसन, केशव महाराज, तबरेज शम्सी, एल. एनगिडी.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha