Glenn Maxwell BBL Record: ऑस्ट्रेलियाचा (Australia Cricket) अष्टपैलू खेळाडू तसंच जगातील अव्वल दर्जाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये (BBL) एका धमाकेदार खेळीचे दर्शन घडवले आहे. बिग बॅश लीगच्या सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत मॅक्सवेलने अवघ्या 41 चेंडूत शतक पूर्ण केले आहे. त्याने 64 चेंडूत 154 धावा कुटल्या आहेत.


मॅक्सवेलने मेलबर्न स्टार्सकडून खेळताना होबार्ट हरिकेन्स या संघाविरुद्ध ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे बिग बॅश लीगमधील हा ग्लेनचा 100 वा सामना देखील होता आणि याच सामन्यात त्याने हे धमाकेदार रेकॉर्ड केले आहे. या लीगमधील मॅक्सवेलचे हे दुसरे शतक आहे. लीगमधील हे दुसरे वेगवान शतक असून याआधी 39 चेंडूत क्रेग सिमन्सने 2014 मध्ये शतक ठोकले होते. आजच्या खेळीत मॅक्सवेलने 64 चेंडूत नाबाद 154 धावा केल्या. यावेळी त्याने 22 चौकार आणि 4 षटकार लगावले.



अव्वल दर्जाचा अष्टपैलू


आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) खेळणाऱ्या मॅक्सवेलला लिलावापूर्वी रिटेन केले आहे. एकूण टी-20 कारकिर्दीत मॅक्सवेलने 319 डावांत 7 हजार 656 धावा केल्या आहेत. तर 79 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने 1 हजार 844 धावांसह 33 विकेट्सही घेतल्या आहेत.


हे देखील वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह पाहण्यासाठी - ABP Majha