ICC Men's T20I Team Of The Year : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) वर्ष 2021 च्या सर्वोत्कृष्ट टी20 संघाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संघामध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेलं नाही. विराट, रोहित, बुमराह आणि जाडेजा यांना आयसीसीच्या संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. भारताशिवाय, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघातील एकाही खेळाडूला संघात स्थान मिळालेलं नाही. आयसीसीने  निवडलेल्या संघामध्ये पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रीका संघातील प्रत्येकी  तीन-तीन खेळाडू आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा समावेस आहे. इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश या संघामधील प्रत्येकी एक एक खेळाडू निवडण्यात आला आहे. 


बाबर आजमकडे नेतृत्व - 
यंदा झालेल्या टी२० विश्वचषकात पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत घेऊन जाणाऱ्या बाबर आजमकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. बाबरशिवाय, पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज  मोहम्मद रिजवान आणि वेगवान गोलंदाज आफ्रिदीला संघात स्थान देण्यात आले आहे. मोहम्मद रिजवान याने गेल्यावर्षी धावांचा पाऊस पाडला होता. दक्षिण आफ्रिका संघातील एडन मार्करम, डेविड मिलर आणि तबरेज शम्सी यांनाही संघात स्थान मिळाले आहे.  


ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्श आणि जोश हेजलवुडला आयसीसीने आपल्या संघात स्थान दिलेय. त्याशिवाय बांगलादेश च्या मुस्ताफिजुर रहमान आणि श्रीलंकेच्या वानिंदु हसारंगाला स्थान दिलेय. 


आयसीसीने निवडलेला 2021 चा सर्वोत्कृष्ट T20 संघ - 
जोस बटलर, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), बाबर आजम (कर्णधार), एडन मार्करम, मिशेल मार्श, डेविड मिलर, वानिंदु हसारंगा, तबरेज शम्सी, जोश हेजलवुड, मुस्ताफिजुर रहमान आणि शाहीन शाह आफ्रीदी.






मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live