Virat Kohli, IND VS BAN 1st Test , चेन्नई : भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटी मालिकेला चेन्नईमध्ये सुरुवात झाली. पहिल्या सामन्याचा दुसऱ्या दिवशीचा आज (दि.20) आज संपलाय. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 308 धावांची आघाडी मिळवली आहे. दरम्यान, चेन्नई येथे सुरू असलेल्या भारत वि. बांगलादेश कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये तो बांगलादेशच्या एका गोलंदाजसोबत विनोदी पद्धतीने बोलताना दिसतोय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चेन्नई कसोटीत भारताने 308 धावांची आघाडी घेतली आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात सर्वबाद 149 धावा करु शकला होता.
'हा मलिंगा आहे, यॉर्कर नंतर यॉर्कर टाकतो'
दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. कोहली 37 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. यादरम्यान कोहलीने बांगलादेशी गोलंदाजाची मजेशीर विनोद केला. शाकिब अल हसन कोहलीच्या जवळ उभा होता. तो म्हणाला, 'हा मलिंगा आहे, यॉर्करनंतर यॉर्कर टाकतो.' हे ऐकून शाकिबला हसू आवरता आले नाही. त्याचा व्हिडिओही X वर शेअर करण्यात आला आहे. एकीकडे विराट त्याच्या बोलताना कौतुकही करताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशी फलंदाजाला चिमटाही काढतोय.
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाकडे 308 धावांची आघाडी
विराट कोहलीसोबत ऋषभ पंतचाही असाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बांगलादेशी खेळीदरम्यान तो रवींद्र जडेजासोबत मस्करी करताना दिसला होता. रोहित शर्माचा व्हिडिओही दाखवण्यात आला. ड्रेसिंग रूममध्ये तो शुभमन गिलसोबत चेष्टा करताना पाहायला मिळाला. यावेळी कोहलीही त्याच्यासोबत होता. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 376 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात 81 धावांवर 3 गडी गमावले. टीम इंडिया दुसऱ्या दिवशी धावफलक उंचावण्याचा प्रयत्न करेल. भारताने आतापर्यंत 308 धावांची आघाडी मिळवली आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांवर सर्वबाद झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या