Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती आणि काही काळानंतर त्याला जामीन मिळाला होता. विनोद कांबळीवर मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या सोसायटीच्या गेटवर कार ठोकल्याचा आरोप आहे, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळीवर भारतीय दंड संहिता कलम 279 (बेपर्वाईने वाहन चालवणे), 336 (इतर व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण करणे) आणि 427 (हानी पोहोचवणे) अंतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेनंतर कांबळीने कॉम्प्लेक्सच्या चौकीदाराशी आणि काही रहिवाशांशी वाद घातला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर हे प्रकरण आणखी वाढले आणि त्याला अटक करण्यात आली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. विनोद कांबळी यांची भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्या रक्ताचा नमुनाही सीएसाठी सुरक्षित ठेवण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.


विनोद कांबळीची कारकीर्द 
18 जानेवारी 1972 रोजी मुंबईत जन्मलेल्या विनोद कांबळीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑक्टोबर 1991 मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला. दोन वर्षांनंतर 1993 मध्ये चमकदार फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कांबळीने 17 कसोटीत 54.2 च्या सरासरीने 1084 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने दोन द्विशतकं, चार शतकं आणि तीन अर्धशतकं झळकावली. त्याच वेळी, 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये, कांबळीने 2 शतके आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने 2477 धावा केल्या. कांबळीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2000 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha