Ishan Kishan Discharged: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला फलंदाजी करताना दुखापत झाली. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारानं 144 किमी वेगानं टाकलेला बाऊन्सर ईशान किशनच्या डोक्याला जाऊन आदळला. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळणार की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.


श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून मैदानात उतरलेल्या सलामीवीर ईशान किशनला चौथ्या षटकात लाहिरू कुमारचा बाऊन्सर लागला. लाहिरू कुमारा त्याच्या दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकत होता. लाहिरूनं 144 किमी/प्रतितास वेगानं बाऊन्सर टाकला. या चेंडूवर ईशाननं पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो चुकला आणि चेंडू त्याच्या हेल्मेटवर जाऊन जोरानं आदळला. यानंतर ईशान किशनला कंगाला येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता समोर आलेल्या वृत्तानुसार, ईशान किशनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. त्याला अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. अशा स्थितीत तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याचं खेळणं संशयास्पद मानलं जात आहे.


एनएनआयचं ट्वीट-



दिनेश चंडीमल दुखापतग्रस्त
ईशान किशनसह श्रीलंकेचा फलंदाज दिनेश चंडीमल यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याला दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. ज्यामुळं आज भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.


भारताचा टी-20 मालिकेवर कब्जा
तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत भारतानं सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिकेवर कब्जा केलाय. तर, तिसरा टी-20 सामना औपचारिकता म्हणून खेळला जाईल. धर्माशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिशएन स्टेडिअमवर आजचा सामना रंगणार आहे.  


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha