Shahnawaz Dahani: पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीनं नुकतीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत (Mahendra Singh Dhoni) झालेल्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup 2021) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर शाहनवाजनं धोनीची भेट घेतली होती. त्यावेळी शाहनवाजनं धोनीसोबत एक फोटोही काढला होता, जो त्यावेळी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.


“मला महेंद्रसिंग धोनीचा स्तर समजायला खूप वेळ लागेल. त्याला भेटणं हे एक स्वप्न होते आणि तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी मला आयुष्य कसं जगायचं आणि मोठ्यांचा कसा आदर करायचा? या गोष्टी त्यानं मला सांगितल्या. त्याचे शब्द माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरले. तो म्हणाले की, क्रिकेटमध्ये चांगलं आणि वाईट दिवस येतात. या गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. तुम्हाला सर्वात जास्त आवडत असलेल्या खेळासाठी समर्पित असलं पाहिजे.” असं शाहनवाजनं म्हटलंय. तसेच धोनीनंतर आता त्यानं जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जोफ्रा आर्चरला भेटण्याची इच्छा व्यक्त केलीय.


टी-20 विश्वचषकात गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्ताननं भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. एवढेच नाही तर विश्वचषकात पाकिस्तानचा भारताविरुद्धचा हा पहिला विजय ठरला. ज्याचा जल्लोष पाकिस्तानात मोठ्या उत्साहात करण्यात आला. त्याचवेळी त्या सामन्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha