एक्स्प्लोर

SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा पाच विकेट्सनं पराभव

Vijay Hazare Trophy Final Live: महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात आज (2 डिसेंबर 2022) विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना रंगणार आहे.

Key Events
Vijay Hazare Trophy Final Score Live Updates Maharastra vs Saurashtra Match Live Telecast Online SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा पाच विकेट्सनं पराभव
SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022 Final LIVE UPDATES

Background

SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022 Final LIVE UPDATES: महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात आज (2 डिसेंबर 2022) विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राचा संघानं विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. तर, सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांना ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय. या स्पर्धेत सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. तर, महाराष्ट्राच्या फलंदाजांनी विरोधी संघातील गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणलंय. 

ऋतुराज गायकवाडची जबरदस्त फलंदाजी
कर्णधार ऋतुराज गायकवाडवर महाराष्ट्राची फलंदाजी अवलंबून आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं स्वबळावर महाराष्ट्राला फायनलमध्ये पोहचलं आहे. गायकवाडनं या स्पर्धेत चार सामन्यांत 552 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद 220 धावांची विक्रमी खेळी केली. त्या डावात त्यानं एका षटकात सात षटकारही मारले. त्याच्याशिवाय महाराष्ट्राचा आणखी एक फलंदाज अंकित बावणेनं आठ डावांत 572 धावा केल्या आहेत.

जयदेव उनादकटची दमदार गोलंदाजी
सौराष्ट्राची गोलंदाजी कर्णधार जयदेव उनादकटच्या खांद्यावर असेल. या स्पर्धेत त्यानं 18 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्यानं सेमी फायनलमध्ये कर्नाटकविरुद्ध 26 धावांत चार आणि हिमाचलविरुद्धच्या गट सामन्यात 23 धावांत पाच विकेट्स घेतल्या आहेत.

सौराष्ट्राचा चेतेश्वर पुजारा, साकारिया सामन्याला मुकणार
सौराष्ट्रचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा या सामन्यात खेळू शकणार नाही. तो सध्या बांगलादेशमध्ये भारत अ संघासोबत कसोटी मालिकेची तयारी करत आहे. याशिवाय सौराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाही या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. तामिळनाडूविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.

राहुल त्रिपाठी महाराष्ट्राकडून खेळू शकणार नाही
राहुल त्रिपाठी महाराष्ट्राकडून खेळू शकणार नाही. बांगलादेशविरुद्ध येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सत्यजीत बच्छाव, अंकित बावणे, अजीम काझी, राजवर्धन हंगरगेकर, शमशुजामा काझी, सौरभ नवले (विकेटकिपर), मनोज इंगळे, मुकेश चौधरी, पवन शहा, नौशाद शेख

सौराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन:
हार्विक देसाई (विकेटकिपर), शेल्डन जॅक्सन, जय गोहिल, समर्थ व्यास, प्रेरक मंकड, अर्पित वसावडा, चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, जयदेव उनाडकट (कर्णधार), कुशांग पटेल, पार्थ भुत

हे देखील वाचा-

14:26 PM (IST)  •  02 Dec 2022

सौराष्ट्राची चांगली सुरुवात; हार्विक देसाई, शेल्डन जॅक्सन क्रिजवर

महाराष्ट्रानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सौराष्ट्राची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर हार्विक देसाई आणि शेल्डन जॅक्सन संयमी खेळी करत संघाचा डाव पुढं घेऊन जात आहेत. 

13:03 PM (IST)  •  02 Dec 2022

महाराष्ट्राचं सौराष्ट्रसमोर 249 धावांचं आव्हानं

Vijay Hazare Trophy 2022 Final: कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) शतकी खेळीच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघानं सौराष्ट्रासमोर (Maharashtra vs Saurashtra) 249 धावांचं लक्ष्य ठेवलंय. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला महाराष्ट्राचा संघ संघर्ष करताना दिसला. मात्र, ऋतुराज गायकवाडनं एकाकी झुंज देत 131 चेंडूत 108 धावांची खेळी केली. ऋतुराज व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. दरम्यान, सौराष्ट्राच्या संघानं गोलंदाजी हीच त्यांची खरी ताकद असल्याचं दाखवून दिलं. त्यांनी या सामन्यात अत्यंत किफायती गोलंदाजी केली.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Embed widget