U19 Asia Cup 2024 : BCCIने केली संघाची घोषणा! 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, पाकिस्तानविरुद्ध 'या' दिवशी रंगणार सामना
बीसीसीआयने अंडर-19 आशिया कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये वयाच्या 13व्या वर्षी बिहारचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याला स्थान मिळाले आहे.
India U19 squad for ACC Men's U19 Asia Cup 2024 announced : बीसीसीआयने अंडर-19 आशिया कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये वयाच्या 13व्या वर्षी बिहारचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याला स्थान मिळाले आहे. ही स्पर्धा UAE मध्ये होणार आहे जी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. भारतीय संघ हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून या संघाने आतापर्यंत 8 वेळा विजेतेपद पटकावले आहे. यावेळी टीम इंडियाला अ गटात ठेवण्यात आले असून त्यात पाकिस्तान, जपान आणि यूएई या संघांचाही समावेश आहे.
टीम इंडियाचा पाकिस्तानशी होणार
तर ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका हे संघ आहेत. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ 26 नोव्हेंबरला शारजाहमध्ये बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. यानंतर संघाला 30 नोव्हेंबर रोजी दुबईत पाकिस्तानच्या अंडर-19 संघाविरुद्ध सर्वात मोठा सामना खेळावा लागणार आहे. आणि त्यानंतर टीम इंडियाला पुढचा सामना जपान आणि UAE विरुद्ध खेळायचा आहे.
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
13 वर्षीय वैभव सूर्यवंशी तेव्हा प्रसिद्धीझोतात आला जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाविरुद्ध शतक झळकावले. सध्या तो बिहारकडून पंजाबविरुद्ध रणजी सामना खेळत आहे. मुंबईचा सलामीवीर आयुष म्हात्रेनेही रणजी ट्रॉफीमध्ये 176 धावांची खेळी करताना निवडकर्त्यांना प्रभावित केले. अंडर 19 आशिया कपची ही 11 वी आवृत्ती आहे. शेवटच्या तीन आवृत्त्या यूएईमध्ये झाल्या आहेत.
अंडर-19 आशिया कपसाठी भारतीय संघ (India U19 Squad for Asia Cup 2024) :
आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, मोहम्मद अमान (कर्णधार), किरण चोरमले (उपकर्णधार), प्रणव पंत, हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक), अनुराग कवडे (यष्टीरक्षक), हार्दिक राज, मोहम्मद अनस, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा, निखिल कुमार.
राखीव : साहिल पारख, नमन पुष्पक, अनमोलजीत सिंग, प्रणव राघवेंद्र, डी दीपेश.
अंडर-19 आशिया कप स्पर्धेतील भारताच्या अंडर-19 संघाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
भारत अंडर-19 विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 : 30 नोव्हेंबर, दुबई (सकाळी 10:30)
भारत अंडर-19 विरुद्ध जपान अंडर-19 : 2 डिसेंबर, शारजाह (सकाळी 10:30)
भारत अंडर-19 वि UAE अंडर-19: 4 डिसेंबर, शारजाह (सकाळी 10:30)
पहिला उपांत्य सामना : 6 डिसेंबर, दुबई (भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30)
दुसरा उपांत्य सामना : 6 डिसेंबर, शारजाह (सकाळी 10:30)
अंतिम सामना : 8 डिसेंबर, दुबई (सकाळी 10:30)
हे ही वाचा -