(Source: Poll of Polls)
विश्वचषकात एकाच डावात सर्वाधिक षटकार कुणी मारले? युनिवर्स बॉस दुसऱ्या क्रमांकावर
पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत झालेल्या 12 विश्वचषकात स्पर्धेत अनेक विक्रम झाले आहेत.
Top 5 Batters with most sixes in an World Cup Inning : पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत झालेल्या 12 विश्वचषकात स्पर्धेत अनेक विक्रम झाले आहेत. चौकार षटकारांची आतषबाजीही झाली. सांघिक आणि वैयक्तिक विक्रमांचे इमले उभारले गेले. त्यापैकीच एक म्हणजे, विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम होय. यामध्ये आघाडीच्या पाच फलंदाजामध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. पाहूयात, विश्वचषक सामन्यातील एका डावात कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारले
5. रिकी पाँटिंग (Ricky Ponting) :
विश्वचषकातील एकाच डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधारापैकी एक असलेला रिकी पाँटिंग पाचव्या क्रमांकावर आहे. 2003 वर्ल्डकप फायनल सामन्यात पाँटिंगने वादळी फलंदाजी केली होती. त्याच डावात पाँटिंगने षटकार ठोकण्याचा विक्रम केला. भारताविरोधात झालेल्या सामन्यात पाँटिंगने 121 चेंडूत 140 धावांची खेळी केली होती. या खेळीत पाँटिंगने 8 षटकार ठोकले होते. पाँटिंगची ही खेळी आजही अनेक भारतीयांच्या काळजात वार करते.
4. डेविड मिलर (David Miller) :
क्रिकेट विश्वात किलर मिलर म्हणून ओळखला जाणारा डेविड मिलर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. 2015 च्या विश्वचषकात डेविड मिलरने एकाच डावत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. झिम्बाब्वेविरोधात मिलरने धावांचा पाऊस पाडला होता. डेविड मिलरने 92 चेंडूत 138 धावांची सुसाट खेळी केली होती. या खेळीत त्याने सात चौकार आमि नऊ मॉन्स्टर षटकार मारले होते. मिलरच्या खेळीने झिम्बॉब्वेची गोलंदाजी दुबळी जाणवली होती.
3. मार्टिन गप्टिल (Martin Guptill) :
विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करणाऱ्या मार्टिन गप्टिलचा या यादीत समावेश नसेल, असे होऊच शकणार नाही. एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये गप्टिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. मार्टिन गप्टिल याने 237 धावांची खेळी केली होती. यामध्ये 24 खणखणीत चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार मारले होते. गप्टिलची ही खेळी विश्वचषकातील सर्वात विस्फोटक खेळीमध्ये गणली जाते.
2. ख्रिस गेल (Chris Gayle) :
ख्रिस गेल याला क्रिकेटविश्वात युनिवर्स बॉस म्हणून ओळखले जाते. गेलच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. गिलच्या आक्रमक फलंदाजीसमोर जगभरातील गोलंदाजी दुबळी जाणवतेच. 2015 च्या विश्वचषकात ख्रिस गेल याने भीमपराक्रम केला होता. ख्रिस गेलच्या बॅटमधून द्विशतक निघाले होते. 2015 च्या विश्वचषकात झिम्बॉब्वेच्या विरोधात ख्रिस गेलने 215 धावांची वादळी खेळी केली होती. ख्रिस गेलने झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला होता. ख्रिस गेल याने या डावात तब्बल 16 षटकार ठोकले होते. एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत गेल दुसऱ्या स्थानावर आहे.
1. इयोन मोर्गन (Eoin Morgan) :
इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकून देणारा इयोन मोर्गन या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. इयोन मोर्गन याने विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. 2019 च्या विश्वचषकात इयोन मोर्गन याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस पडला होता. अफगाणिस्तानच्या विरोधात इयोन मोर्गन याने तब्बल 17 षटकार मारले होते. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा इयोन मोर्गन याने समाचार घेतला होता. इयोन मोर्गन याने 2008 च्या स्ट्राईक रेटने फक्त 71 चेंडूमध्ये 148 धावांची खेळी केली होती.