Shocking: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे बुरे हाल! खेळाडूच्या उपचारासाठी नाहीत पैसे? आफ्रिदीचे गंभीर आरोप
T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय.
T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. या स्पर्धेत पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीलाही (Shaheen Afridi) संघात स्थान मिळालं आहे. मात्र, टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक असताना शाहीन आफ्रिदीच्या फिटनेसवरून नव्या वादाला सुरुवात झालीय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहीन शाह आफ्रिदीच्या उपचारासाठी पैसे न दिल्याचा आरोप करण्यात आलाय. हा आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीकडून (Shahid Afridi) करण्यात आलाय.
श्रीलंकाविरुद्ध जुलै महिन्यात खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेत क्षेत्ररक्षणादरम्यान शाहीन आफ्रिदीला दुखापत झाली होती. शाहिन आफ्रिदीला पीसीबीकडून कोणतंही सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप शाहिद आफ्रिदीने केला आहे. दुखापतीमुळं शाहीन आफ्रिदीला नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेला मुकावं लागलंय. याचदरम्यान, शाहीन आफ्रिदी दुखापतीवर उपचार घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली होती. विमानाच्या तिकिटापासून तर प्रत्येक गोष्टींचा खर्च शाहीन आफ्रिदी स्वत: पैशानं करत आहे. एवढंच नव्हे तर, त्याच्या सुरु असलेल्या उपचाराचा खर्चही तो स्वत:च्या खिशातून करत आहे, असा आरोप शाहीद आफ्रिदीनं केला आहे.
पीसीबीकडून खेळाडूंवर दुर्लक्ष केल्याचा आरोप
पुढे शाहिद आफ्रिदी म्हणाला की, "शाहीन आफ्रिदी दुखापतीतून सावरत आहे. ऑस्ट्रेलिया पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या संघाचा भाग आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आपल्या खेळाडूंची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी मेडिकल सुविधांची व्यवस्था करायला हवी, असंही शाहीद आफ्रिदीनं म्हटलंय."
शाहीन आफ्रिदीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट्स
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रक शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट्स दिलीय. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीनंतर संघात परतलाय. सध्या शाहीन लंडनमध्ये रिहॅबमध्ये आहे. शाहीन दुखापतीतून सावरत असून आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी तो पूर्णपणे बरा होईल. महत्वाचं म्हणजे, शाहीन आफ्रिदी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसून त्याची इग्लंडविरुद्ध सात सामन्यांच्या टी-20 मालिकेत संघात निवड झालीय.
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद आणि उस्मान कादिर
राखीव खेळाडू- फखर जमान, मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी
हे देखील वाचा-