Ind vs SL 3rd T20: अत्यंत रोमांचक झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेला (Ind vs SL) सुपर ओव्हरमध्ये नमवले. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला वॉशिंग्टन सुंदर विरुद्ध केवळ दोन धावा काढता आल्या. यानंतर पहिल्याच चेंडूवर कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) चौकार मारत भारताला दिमाखात विजयी केले.
सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लागला, ज्यामध्ये टीम इंडियाचा विजय झाला. मात्र, सुपर ओव्हरपूर्वी रिंकू सिंग आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आपल्या गोलंदाजीने चांगलीच खळबळ माजवली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि खलील अहमद यांचे षटक बाकी असताना रिंकू सिंहने डावातील 19वे षटक टाकले आणि सूर्यकुमार यादवने 20वे षटक टाकले. रिंकू सिंह आणि सूर्यकुमार यादव यांनी शेवटच्या दोन षटकांत गोलंदाजी करणं यामध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा मोठा वाटा होता. गौतम गंभीरचा एका मेसेजनंतर सूर्यकुमारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
रिंकूने अन् सूर्याच्या प्रत्येकी 4 विकेट्स-
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी डावातील 19वे षटक टाकण्यासाठी आलेल्या रिंकू सिंहने केवळ 3 धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. यामध्ये कुशल परेराची मोठी विकेट होती. त्यानंतर शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 06 धावांची गरज होती. मात्र, आता संघाच्या केवळ 4 विकेट शिल्लक होत्या. येथून डावाचे शेवटचे षटक मोहम्मद सिराज किंवा खलील अहमद यांच्यापैकी एकाला दिले जाईल, अशी अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. डावाच्या शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वतः कर्णधार सूर्यकुमार यादवने घेतली.
तो एक क्षण-
रिंकू सिंग हा फलंदाज आहे, पण त्याने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात गोलंदाजी केली. कारकिर्दीतील दुसऱ्या चेंडूवर त्याने 46 धावा करून खेळत असलेल्या कुसल परेराची विकेट घेतली. त्याच षटकात त्याने रमेश मेंडिसची विकेटही घेत भारताला सामन्यात परत आणले. भारताच्या विजयातील हा एक क्षण महत्वाचा होता.
संबंधित बातमी:
Ind vs SL T20: 6 चेंडूत 6 धावा...मेन गोलंदाज नव्हे सूर्या आला अन् श्रीलंकेला केले चीतपट, पाहा Video