Temba Bavuma : पाय जायबंदी झाला, पण संघासाठी टेम्बा बावुमा शेवटपर्यंत लंगडत धावत राहिला, सगळं लॉर्ड्स स्टेडियम भारावून बघत राहीलं
Temba Bavuma News : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या मैदानावर अनेक चांगले क्षण घडले, पण ज्याने सर्वांच्या मन घर केले तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा.

Temba Bavuma Australia Vs South Africa WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या मैदानावर अनेक चांगले क्षण घडले, पण ज्याने सर्वांच्या मन घर केले तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा. सामना सुरू असताना बावुमाच्या पायाला दुखापत झाली होती. साध्या शब्दांत सांगायचं तर तो लंगडत होता. पण तो शेवटपर्यंत मैदानावर लढत राहिला, धावत राहिला, संघासाठी झुंजत राहिला. लॉर्ड्समधील हजारो प्रेक्षक आणि सहकाऱ्यांनी त्याचा हा संघर्ष पाहून जोरदार दाद दिली.
अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार बावुमा मैदानावर आला आणि त्याने सलामीवीर एडेन मार्करामला चांगली साथ दिली. बावुमाने दुखापतीशी झुंजताना कर्णधारपदाची खेळी केली आणि मार्करामसोबत नाबाद शतकी भागीदारी करून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका 27 वर्षांनंतर पहिले आयसीसी जेतेपद जिंकण्याकडे वाटचाल करत आहे.
𝑪𝒐𝒖𝒓𝒂𝒈𝒆 𝒖𝒏𝒅𝒆𝒓 𝒇𝒊𝒓𝒆 🫡
— ICC (@ICC) June 13, 2025
Temba Bavuma's crucial half-century, despite an injury, inches South Africa closer to glory 👏
Follow #WTC25 Final LIVE ➡️ https://t.co/pQ7yVBzaQL pic.twitter.com/stsYamBBa0
बावुमाने मोडला विल्यमसनचा विक्रम
कर्णधार टेम्बा बावुमा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. आतापर्यंत त्याच्या बॅटवरून 5 चौकार लागले आहेत. बावुमाचे हे कसोटीतील 25 वे अर्धशतक आहे. त्याने पहिल्या डावातही चांगली फलंदाजी केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस त्याने 121 चेंडूत 65 धावा केल्या आहेत. फलंदाजी करताना बावुमा क्रॅम्प्सशी झुंजत होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कर्णधाराने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने केन विल्यमसनचा विक्रम मोडला. 2021 मध्ये, विल्यमसनने भारताविरुद्ध चौथ्या डावात नाबाद 52 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकाची विजयाकडे वाटचाल
डब्ल्यूटीसी फायनल जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 282 धावांची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात 207 धावा केल्या. एकेकाळी संघाचा धावसंख्या 73 धावांत 7 विकेट्स होता. मिचेल स्टार्कने नाबाद 58 धावा करत संघाची धुरा हाती घेतली. कागिसो रबाडाने शानदार गोलंदाजी केली आणि 4 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली आणि रायन रिकेल्टन 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्कराम आणि मुल्डरने 61 धावांची भागीदारी केली. स्टार्कने मुल्डरला आऊट केले. त्यानंतर एडेन मार्करामने शतक झळकावले आणि कर्णधार बावुमासोबत सामना उलटला. दोघांमध्ये 143 धावांची भागीदारी झाली आहे.
हे ही वाचा -
Aiden Markram : शतक नव्हे, इतिहास! एडन मार्करमने शतक ठोकताच बदललं सगळं गणित, कांगारूंना फुटला घाम





















