Team India New T20 Jersey : खांद्यावर पांढरी पट्टी, कॉलरवर तिरंगा... रोहित शर्माकडून टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच! पाहा Video
Team India T20 World Cup 2026 Jersey Revealed : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने (BCCI)टी-20 वर्ल्ड कप 2026साठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च केली आहे.

Team India New T20 Jersey : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने (BCCI)टी-20 वर्ल्ड कप 2026साठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च केली आहे. रायपूरमध्ये भारत–दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान ही जर्सी अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आली. भारताने या सामन्यात दमदार फलंदाजी करत 358 धावांचा डोंगर उभारला आणि भारतीय डाव संपताच जर्सीचे अनावरण झाले. नव्या जर्सीचा प्रमुख रंग यापूर्वीप्रमाणेच गडद निळाच आहे, मात्र डिझाइनमध्ये आकर्षक बदल करण्यात आले आहेत. जर्सीच्या खांद्यावर पांढरी पट्टी आहे. सर्वात खास म्हणजे भारतीय तिरंगा आता जर्सीच्या कॉलरवर झळकणार आहे. तसेच जर्सीवर उभ्या निळ्या रेषा देऊन तिला आधुनिक आणि आकर्षक लूक देण्यात आला आहे.
The ⭐s are looking 𝙩𝙬𝙤 good on #TeamIndia’s new T20I jersey! 👕
— Star Sports (@StarSportsIndia) December 3, 2025
The hunt for the third ⭐ begins on Feb 7 at the ICC Men’s T20 World Cup 2026 💙 pic.twitter.com/gdnQdtq2Hc
तिलक वर्मा अन् रोहित शर्माकडून नवीन जर्सी लाँच
ही नवी जर्सी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज तिलक वर्मा यांनी स्टेजवर येऊन नवीन जर्सी लाँच केली. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया आणि Adidas च्या अधिकाऱ्यांनी खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कप जर्सी सुपूर्द केली. क्रिकेट चाहत्यांसाठी हा क्षण अत्यंत विशेष ठरला. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान टी-20 वर्ल्ड कप 2026 आयोजित केला जाणार असून, त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता आणखी वाढली आहे.
भारता–दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडिया ही नवी जर्सी परिधान केलेली दिसणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका भारतीय संघाच्या नव्या जर्सीची पहिली झलक चाहत्यांना दाखवणार आहे.
लॉन्चिंगच्या वेळी रोहित शर्मा काय म्हणाला?
जर्सीच्या अनावरणावेळी रोहित शर्मा म्हणाला, “2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुन्हा हा किताब मिळवायला 15 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला. आता वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि माझ्या शुभेच्छा नेहमीच टीमसोबत आहेत. हा टूर्नामेंट खूप रोमांचक होणार आहे. मला खात्री आहे की संपूर्ण देश टीमच्या पाठीशी उभा राहील.”
टी-20 वर्ल्ड कप 2026 कधी सुरू होणार?
टी-20 वर्ल्ड कप 2026 पुढच्या वर्षी 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, 8 मार्चला अंतिम सामना खेळला जाईल. या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 7 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर USA विरुद्ध पहिला सामना खेळून मोहिमेला सुरुवात करेल. तर भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असल्याने त्यांची हाय-वोल्टेज भिडंत निश्चित आहे. हा सामना 14 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.
भारत कोणत्या ग्रुपमध्ये आहे?
या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी आहेत आणि त्यांना चार गटांत विभागण्यात आले आहे.
- ग्रुप A: भारत, पाकिस्तान, नामिबिया, नेदरलँड्स
- ग्रुप B: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिंबाब्वे, ओमान, आयर्लंड
- ग्रुप C: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, इटली, नेपाळ
- ग्रुप D: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई
हे ही वाचा -





















