Suryakumar Yadav : टी 20 संघाच्या कॅप्टनपदाच्या शर्यतीत नाव आघाडीवर, सूर्यकुमार यादवनं ठेवलेली सूचक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत
Suryakumar Yadav : टीम इंडियाच्या टी 20 टीमचा कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांचं नाव शर्यतीत आहे.
नवी दिल्ली : भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं होतं. भारताच्या ऐतिहासिक विजयात सूर्यकुमार यादवनं घेतलेला डेव्हिड मिलरचा कॅच ऐतिहासिक ठरला. सूर्यकुमार यादवच्या कॅचमुळं संपूर्णपणे मॅच भारताच्या बाजूनं फिरली. भारतानं टी 20 वर्ल्ड कप तब्बल 17 वर्षानंतर जिंकला तर आयसीसी स्पर्धांच्या विजेतेपदाचा दुष्काळ 11 वर्षानंतर संपवला. रोहित शर्मानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी देखील निवृत्ती जाहीर केली. यामुळं टी 20 संघाचा कॅप्टन म्हणून उपकॅप्टन हार्दिक पांड्याच्या नावाची चर्चा होती. हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर असतानाच अचानक सूर्यकुमार यादवचं नाव चर्चेत आलं. हे सर्व सुरु असताना सूर्यकुमार यादवनं ठेवलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा आहे.
काही माध्यमांनी सूर्यकुमार यादवचं नाव कॅप्टन पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं म्हटलं. सूर्यकुमार यादवनं एक इन्स्टाग्राम स्टोरी ठेवलेली आहे. सूर्यकुमार यादवनं देवाचा फोटो इन्स्टाग्राम ठेवत त्याला अभिवादन केलं आहे.
Surya Kumar Yadav latest Insta story : In which he has put a photo of God and a folded hands emoji, which means that he has become the captain and he has been informed about it, that's why he is thanking god🙏
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) July 17, 2024
Congratulations @surya_14kumar 🙏🔥 pic.twitter.com/XOXqxx1qzB
हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवचं नाव शर्यतीत
टीम इंडियाच्या टी 20 टीमचा कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. टी 20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या उपकॅप्टन होता. प्रशिक्षक, निवड समिती आणि बीसीसीआय आगामी टी 20 वर्ल्ड कपचा विचार करुन कॅप्टन निवडण्याची शक्यता आहे. यामुळं हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं जाणार की सूर्यकुमार यादवच्या हाती संघाची धुरा सोपवली जाणार हे पाहावं लागेल. नव्यानं निवड झालेला प्रशिक्षक गौतम गंभीर याचा कल सूर्यकुमार यादवच्या बाजून असल्याच्या चर्चा आहेत. सूर्यकुमार यादवनं यापूर्वी कोलकात नाईट रायडर्समध्ये गंभीर सोबत काम केलेलं आहे. सूर्यकुमारनं टी 20 टीमचा कॅप्टन म्हणून 7 सामन्यात भारताचं नेतृत्त्व केलं आहे. त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत.
भारताचा श्रीलंका दौरा 27 जुलैपासून सुरु होणार
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिका 27 जुलैपासून सुरु होणार आहे. या मालिकेत भारताचं नेतृत्त्व कोण करणार हा प्रश्न कायम आहे. 27, 28 आणि 30 जुलै रोजी टी 20 सामने होणार आहेत..
संबंधित बातम्या :