Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धा 28 जुलै, 2022 पासून इंग्लंडच्या बर्मिंघहमध्ये सुरु होणार आहेत. यंदा कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेट खेळालाही जागा देण्यात आली आहे. सध्यातरी केवळ महिलांचे सामने होणार असून एकूण 8 संघ यावेळी सहभागी होणार आहेत. यामध्ये भारतीय महिलांचाही समावेश आहे.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेसाठी महिला क्रिकेट संघ जाहीर केला असून भारतीय महिला या ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बारबाडोस संघासोबत आहेत. तर भारतीय महिलांचे सामने कधी आणि कुणासोबत होतील हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
सामना | तारीख | ठिकाण |
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | 29 जुलै, 2022 | एजबेस्टन, बर्मिगहम, इंग्लंड |
भारत विरुद्ध पाकिस्तान | 31 जुलै, 2022 | एजबेस्टन, बर्मिगहम, इंग्लंड |
भारत विरुद्ध बारबाडोस | 3 ऑगस्ट, 2022 | एजबेस्टन, बर्मिगहम, इंग्लंड |
हरमनप्रीत कौर कर्णधार
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला संघाचं नेतृत्त्व हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) करणार असून स्मृती मंधाना (Smriti Mandhana) उपकर्णधार असणार आहे. भारताने एकूण 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आयसीसीसह बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन दिली. तर नेमका संघ कसा आहे, यावरही नजर फिरवू....
भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस. मेघना, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देवोल.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार
- Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रासह 37 खेळाडू कॉमनवेल्थ गेम्ससाठी सज्ज; बर्मिंगहममध्ये रचणार इतिहास
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी 'या' भारतीय महिला कुस्तीपटूंची निवड, इंग्लंडमध्ये रंगणार स्पर्धा