(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : है तय्यार हम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारत सज्ज, बीसीसआयनं शेअर केले सरावाचे फोटो
IND vs AUS : पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत असून उद्या अर्थात 17 फेब्रुवारीपासून सामन्याला सुरुवात होत आहे.
IND vs AUS Test Series : भारतीय संघ (Team India) सध्या कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर (Border Gavaskar Series) मालिका सुरु असून पहिला सामना नुकताच भारताने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता मालिकेत दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार असून हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी सर्वच खेळाडूंनी कसून सराव सुरु केला आहे. बीसीसीआयनं खेळाडूंचे सरावादरम्यानचे फोटो शेअर देखील केले आहेत.
पाहा फोटो-
Hard-work 💪
— BCCI (@BCCI) February 16, 2023
Focus 👌
Smiles 😊#TeamIndia gear up for the 2⃣nd #INDvAUS Test 👍 👍 pic.twitter.com/gY4wkgIlfc
कसा आहे भारतीय संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
सलामीच्या सामन्यात भारताचा दमदार विजय
नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (India vs Australia 1st Test) भारताने एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली. भारताने हा सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
दिल्लीत टीम इंडियाचाच दबदबा
1987 पासून भारताने दिल्लीत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. दिल्लीत खेळल्या गेलेल्या 34 पैकी 13 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे, तर फक्त सहा गमावले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दिल्लीत एकूण 7 कसोटी सामने खेळला आहे. 1959 पासून कागारुंचा संघ विजयाची वाट पाहत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2013 साली दिल्लीत खेळला गेला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 8 विकेट्सनी कांगारुंचा पराभव केला होता. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 14 बळी घेत टीम इंडियासाठी मोठ्या विजयाचा पाया रचला होता.
हे देखील वाचा-