INDIA vs ENGLAND, slow overrate: इंग्लंड विरुद्ध भारत हा बर्मिगहमच्या एजबेस्टन (Edgbaston) येथे पार पडलेल्या सामन्यात भारताने सामना गमावल्यामुळे मालिकाविजयाचं स्वप्नही भारताचं भंगलं. पण सोबतच आयसीसीने एक आणखी झटका भारताला दिला आहे. स्लो ओव्हररेट ठेवल्यामुळे आयसीसीने दंड ठोठोवला आहे. साध्या शब्दात सांगायचं झालं तर निर्धारीत वेळेत भारत निर्धारीत ओव्हर टाकू शकला नाही, स्लो स्पीड ठेवल्यामुळे मॅच रेफरी डेविड बून यांनी भारतीय संघाला हा दंड ठोठावला आहे.


WTC मधील 2 गुणही कापले


स्लो ओव्हर रेट (slow overrate) ठेवल्यामुळे आयसीसीच्या (ICC) आचारसंहिताच्या 2.22 नुसार मॅच फीसमधील 40 टक्के दंड म्हणून कापण्यात आला आहे. तसंच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) अर्थात WTC च्या नियमांच्या 16.11.2 नुसार दोन गुण कमी करण्यात आले आहेत. 


भारत सात विकेट्सनी पराभूत


तर संबंधित कसोटी सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करताना चौथ्या आणि पाचव्या दिवशी जॉनी बेअरस्टो आणि जो रुट जोडीने (Johny Bairstow and Joe Root) तुफान शतकं ठोकत इंग्लंडला विजय मिळवून दिला. मागील वर्षी सुरु झालेल्या मालिकेतील हा उर्वरीत पाचवा कसोटी सामना होता. मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर होता, ज्यामुळे हा सामना जिंकल्यास भारत मालिकाही जिंकला असता. पण इंग्लंडने सामना जिंकल्याने मालिकाही अनिर्णीत सुटली आहे. 



हे देखील वाचा-