WTC Points Table : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात बर्मिंघममधील मैदानात मागील वर्षीच्या दौऱ्यातील उर्वरीत कसोटी सामना पार पडला. इंग्लंडने 7 विकेट्सने सामना जिंकला. ज्यामुळे भारताचं मालिकाविजयाचं स्वप्न भंगलं, मालिका 2-2 ने अनिर्णित सुटली. या पराभवामुळे कसोटी क्रिकेटचा विश्वचषक मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (WTC Points Table) भारताला मोठं नुकसान झालं आहे. 

सामन्यापूर्वी भारताची विजयाची टक्केवारी 58.33 टक्के इतही होती. पण या पराभवामुळे ही टक्केवारी 53.47 झाली आहे. भारत तिसऱ्या स्थानावर गेला आहे. तर दुसरीकडे फायनलच्या रेसमधून बाहेर झालेल्या इंग्लंडच्या नावावर 33.33 टक्के इतकी होती. ते सातव्या स्थानावर आहेत. दरम्यान भारत तिसऱ्या स्थानावर असला तरी फायनल दोन संघात पार पडणार असल्याने भारताला फायनल खेळायची असल्यास आता होणारे सर्व कसोटी सामने जिंकणं अनिवार्य झालं आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या पराभवाची प्रतिक्षाही करावी लागेल. आता भारत बांग्लादेशविरुद्ध दोन तर ऑस्ट्रेलियाविरुद्घ 4 कसोटी सामने खेळणार आहे. सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 77.78 टक्क्यांनी पहिल्या तर दक्षिण आफ्रिका 71.43 टक्क्यांनी दुसऱ्या स्थानावर आहे.

अशी आहे WTC गुणतालिका

टीम

विजयी टक्केवारी

गुण

विजय

पराभव

अनिर्णित

NR

ऑस्ट्रेलिया

77.78

84

6

0

3

0

दक्षिण आफ्रीका

71.43

60

5

2

0

0

भारत

53.47

77

6

4

2

0

पाकिस्तान

52.38

44

3

2

2

0

वेस्ट इंडीज

50

54

4

3

2

0

श्रीलंका

47.62

40

3

3

1

0

इंग्लंड

33.33

64

5

7

4

0

न्यूझीलंड

25.93

28

2

6

1

0

बांग्लादेश

13.33

16

1

8

5

0

हे देखील वाचा-