India Vs England 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारत पराभवाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. कारण इंग्लंडने 378 धावांचे लक्ष्य अगदी सहज पार करत आणले आहे. दरम्यान यावेळी जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी दमदार फलंदाजी केलीच आहे. पण सोबतच भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या दोन चूकाही यावेळी भारताला अत्यंत महाग पडल्या आहेत. त्या म्हणजे पंतने घेतलेले दोन चूकीचे रिव्ह्यूय.


टीम इंडियाला या कसोटी सामन्यात पराभवाच्या दिशेने जावं लागण्यात फिल्डिंगमधील चूका कारणीभूत आहेतच. भारताचे फलंदाजी कोच विक्रम राठौर यांनी हे मान्य केलं की खेळाडूंनी सोडलेल्या कॅचेस याला कारणीभूत आहेत. यातच पंतनं केलेल्या काही चूका ही भारताला भारी पडल्या आहेत. पंतने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून 203 धावा केल्या. यात शतक आणि अर्धशतकाचा समावेश आहे. यामुळेच भारत सामन्यात आघाडी घेऊ शकला. पण नंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पंतच्याच चूका भारताला महाग पडल्या. यावेळी 31 व्या ओव्हरमध्ये जाडेजाच्या चेंडूवर ऋषभ पंतने एक चूकीचा रिव्ह्यू घेतला. त्यावेळी जो रूटच्या पॅडला लागून बॉल मागे गेला होचा. बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. पण त्याचवेळी पंतने गडबडीत रिव्ह्यू घेतला. ज्यामुळे भारताने रिव्ह्यू गमावला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्येही मोहम्मद शमीच्या ओव्हरमध्ये पंतने चूकीचा रिव्ह्यू घेत आणखी एक रिव्ह्यूय गमावला.


पंतने ठोकल्या 203 धावा





पंतच्या दोन चूका भारताला महाग पडल्या असल्या तरी त्याने सामन्यात उल्लेखणीय कामगिरीही केली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचे एकीकडे आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतत असताना पंतने जाडेजासोबत भारताचा डाव सांभाळला. सोबतच आपलं शतकही पूर्ण करत पुन्हा एकदा कसोटी सामन्यात टी20 प्रमाणे फलंदाजी केली. 89 चेंडूत पंतने शतक पूर्ण केलं. त्याने डावात 111 चेंडूत 20 चौकार आणि 4 षटकार ठोकत 146 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 86 चेंडूत 8 चौकारांसह 57 धावा केल्या. यामुळे एका सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने 203 धावा स्वत:च्या नावे केल्या आहेत.




हे देखील वाचा-