Team India Champions Trophy 2025: भारतीय संघाने 2 जून रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवून दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावला. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामध्ये रवींद्र जडेजाही सामील झाला आहे. रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता भारताला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी तयारी करायची आहे. यामध्ये विराट आणि रोहित खेळणार की नाही यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी उत्तर दिले आहे.
जय शाह म्हणाले की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टी-20 विश्वचषकासारखा संघ तयार केला जाईल. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीही असतील. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारीमध्ये आयोजित केली जाणार आहे. हे वन डे फॉरमॅटमध्ये असेल. टीम इंडियाचे पुढील लक्ष्य हे आयसीसीचे जेतेपद आहे. यामध्ये विराट आणि रोहितही खेळणार आहेत. पीटीआयच्या एका बातमीनुसार, जय शाह म्हणाले की, टीम इंडियाने सर्व विजेतेपदे जिंकावीत अशी माझी इच्छा आहे. आमच्याकडे सर्वात मोठी बेंच स्ट्रेंथ आहे. या संघातील फक्त तीन खेळाडू झिम्बाब्वेशी खेळणार आहेत. आमचा संघ ज्या प्रकारे प्रगती करत आहे, त्यापुढील लक्ष्य जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. यामध्येही अशीच टीम तयार करण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ खेळाडूही खेळणार असल्याची माहिती देखील जय शाह यांनी दिली.
रोहित-विराट वनडे आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करणार -
विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हे दोन खेळाडू आता टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाहीत. कोहली आणि रोहित आता वनडे आणि टेस्ट फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करतील. टीम इंडिया आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी युवा खेळाडूंची निवड केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार-
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. यामध्ये एकूण 8 संघ 15 सामने खेळणार आहेत. पण कदाचित टीम इंडिया इथे खेळायला जाणार नाही. याबाबत अनेक प्रकारची विधाने समोर आली आहेत. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाऊ शकते. टीम इंडियाचे सामने इतर ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ:
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.
India vs Zimbabwe चे वेळापत्रक-
पहिली टी-20 - 6 जुलै, हरारे
दुसरी टी-20 - 7 जुलै, हरारे
तिसरी टी-20 - 10 जुलै, हरारे
चौथी टी-20 - 13 जुलै, हरारे
पाचवी टी-20- 14 जुलै, हरारे