Virat Kohli-Rohit Sharma: 2 वर्ष थांबा,आता नको,पुढचा विश्वचषक भारतात; विराट-रोहितला ड्रेसिंग रुममध्ये समजवण्याचा प्रयत्न
भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2024) फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय संघाने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) आतंरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या या निर्णयानंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्काच बसला. मात्र दोघांच्या या घोषणेनंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय घडलं, याबाबत सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना निवृत्तीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच आणखी एक टी-20 विश्वचषक खेळण्याची विनंती करत समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी ऐकलं नाही, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.
विराट कोहलीने निवृत्ती जाहीर करताना काय म्हटलं?- आता नव्या पिढीनं जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा टी20 विश्वचषक होता. जे मिळवायचं होतं ते मिळालं आहे.
रोहित शर्मा काय म्हणाला?-रोहित शर्मा म्हणाला की, मी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कधीही विचार केला नव्हता, परंतु टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यापेक्षा चांगले काय असू शकते. मी माझ्या भविष्याबाबत असे निर्णय घेत नाही, मला जे आतून चांगले वाटते तेच मी करतो, असं रोहित म्हणाला.
मी भविष्याचा फारसा विचार करत नाही, गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक झाल्यानंतरही मी हा विश्वचषक खेळू की नाही याचा विचार केला नव्हता. मी टी-20 मधून निवृत्ती घेईन असे कधीच वाटले नव्हते, पण सध्याची परिस्थिती अतिशय योग्य आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्ती घेणं हा एक अद्भुत अनुभव आहे, असं रोहित शर्माने सांगतिले.
एक दिवस तुम्हाला वाटतं की तुम्ही धावा काढू शकत नाही आणि असं होतं. देव महान आहे. फक्त संधी, आताच नाही तर कधी नाही अशी स्थिती होती, असं विराटने सांगितले.
भारतासाठी खेळण्याचा टी-20 क्रिकेटमधील अखेरचा सामना होता. आम्हाला वर्ल्ड कप उंचावायचा होता, आम्ही तो उंचावला आहे. हे एक खुलं गुपित होतं, मॅच हरलो असतो तरी जाहीर करणार होतो. पुढच्या पिढीनं टी20 क्रिकेट पुढं घेऊन जायची वेळ आली आहे.
आमच्यासाठी ही दीर्घकाळ प्रतीक्षा होती. एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी वाट पाहावी लागते. रोहितनं 9 विश्वचषक खेळले आहेत. माझा सहावा विश्वचषक आहे. रोहित आजच्या यशाचा हकदार आहे, असं विराट कोहलीने सांगितले.